घरक्रीडासचिन तेंडुलकर क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू - युवराज सिंग 

सचिन तेंडुलकर क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – युवराज सिंग 

Subscribe

सचिनने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून संबोधले आहे. सचिनने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. आपल्या दोन दशकांहून अधिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. सचिनने ट्विटरवर एक पोस्ट करत त्या सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. सचिनला त्यावेळी ब्रायन लारा आणि क्रिस गेल या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी ड्रम दिले होते. त्याबद्दल सचिनने या दोघांचे आभार मानले.

सचिनच्या पोस्टवर रिप्लाय देताना युवराज म्हणाला, ‘तो दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. तू मैदानातून निवृत्त झाला असलास तरी तुला आमच्या हृदयातून कधीही निवृत्त होता येणार नाही. मास्टर ब्लास्टर, क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू.’ सचिनने त्याच्या अखेरच्या कसोटी डावात ७४ धावा केल्या. त्याला फिरकीपटू नरसिंह देवनारायणने माघारी पाठवले होते. भारताने हा सामना सहजपणे जिंकला आणि सामना संपल्यावर सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे डोळे पाणावले होते. सचिन निवृत्त होऊन आता सात वर्षे झाली असली तरी त्याचे बरेच विक्रम अजूनही अबाधित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -