Wednesday, August 5, 2020
Mumbai
26 C

नाशिक त्यानुसार मतदार संघ

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ – म.क्र.११४

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विकासाच्या ऐवजी धर्मकारणामुळे तसेच मुस्लिम समाजातील दखनी - मोमीन वादामुळे मालेगावची निवडणूक ही नेहमीच राज्यभर चर्चेचा विषय होत आलेली आहे. आसिफ शेख...

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. : ११५

नाशिक  जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मालेगाव बाह्य या मतदारसंघात मालेगाव शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव नववसाहत, द्याने, कलेक्‍टरपट्टा या शहरी भागासह ग्रामीण भागातील ७६ गावांचा समावेश या मतदारसंघात...

चांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८

नाशिक जिल्ह्यातील चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. चांदवड देवळा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. स्थापनेपासूनच प्रादेशिक अस्मितेच्या जोखडात अडकलेल्या या मतदारसंघामध्ये चांदवड येथील शहरी वसाहत, त्यासोबतच तालुक्यातील गावठाण...

कळवण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११७

नाशिक जिल्ह्यातील कळवण हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तश्रुंगी देवीचे मंदिर या मतदारसंघात येते. २००९च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. गुजरात सीमेवर असलेला...

निफाड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२१

नाशिक जिल्ह्यातील निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. द्राक्ष, बेदाणे आणि टोमॅटो यांची प्रमुख बाजारपेठ असलेला पिंपळगाव बसवंत हा भाग या मतदारसंघात येतो. निफाड तालुका आणि तालुक्यातील गावे सोबतच ओझर विमानतळ,...

देवळाली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२६

नाशिक जिल्ह्यातील देवळाली हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातील सहा छावणी परिषदपैकी एक असलेला देवळाली हा भाग होय. या मतदारसंघात भगुर, नाशिक तालुक्याचा काही भाग नाशिकरोड परिसर हा भाग येतो. अनुसूचीत...

येवला विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११९

नाशिक जिल्ह्यातील येवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पैठणी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात विणकरी, माळी, वंजारी आणि मराठा आदी समाजाचे प्राबल्य दिसून येते. कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव, पाटोदा आणि येवला हे...

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२२

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. शंभर टक्के आदिवासी असलेल्या पेठ तालुका आणि नागरी वस्ती असलेला दिंडोरी तालुक्याचा समावेश या मतदारसंघामध्ये येतो. हा मतदारसंघ अनुसूचीत जमाती साठी राखीव...

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२७

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नाशिक मुंबई महामार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या इगतपुरी मतदारसंघामध्ये आदिवासी जास्त संख्येने आहे. हा मतदारसंघ आदिवासीसाठी राखीव असून या मतदारसंघात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, टाकेद,...

सिन्नर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२०

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघात सिन्नर तालुक्यातील गावठाण परिसर, बाजूलाच असलेला औद्योगिक भाग तसेच तालुक्यातील छोटी मोठी गावे यांचा समावेश होतो. सध्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत...