एसरचे आठ नवीन गेमिंग लॅपटॉप 

Mumbai
Acer Gaming Laptop

एसरने विस्तृत श्रेणीच्या लॅपटॉप्सचे अनावरण करण्यात आले. गेमिंगच्या चाहत्यांचे प्रेम लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या नव्या कोर्‍या उपकरणांचे मुंबईत एका आलिशान सोहळ्यात हे अनावरण संपन्न झाले. याआधीची एसरची उत्पादने प्रगत स्वरुपाचीच होती, ही नवीन उपकरणे अत्याधुनिक प्रोसेसर, प्रगत पासथ्रू वैशिष्ट्य, नव्या दमाची 3 डी तंत्रज्ञान, 4 जेन एरोब्लेड वेव्ज मॅक्स ऑडीओऍ सूट + वेव्ज एनएक्सऍ 3डी व्हर्च्युअल साऊंड आणि इतर बरेच काही गेमिंगच्या चाहत्यांना सर्वांग सुंदर गेमिंग अनुभव देतात.

यातील अधिकाधिक शक्तिशाली उपकरणे तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत. या आकर्षक उपकरणांमध्ये पावरहाऊस ट्रिटन 900, अतिशय बारीक ट्रिटन 500, हेलिओस  700, हेलिओस 300- 17 इंच, हेलिओस 300- 15 इंच उपलब्ध आहे. कधीतरी गेमिंगवर हात आजमावणार्‍या आणि कामगिरीबाबत आग्रही असणार्‍या ग्राहकांसाठी एसर इंडियाच्या वतीने नायट्रो 7. नायट्रो 5 17-इंच, नायट्रो 5 15-इंच, आणि सहाय्यकारी असेसरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एसर इंडियाचे प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर हरीश कोहली म्हणाले की, भारतात गेमिंग पीसीची वाढती मागणी लक्षात घेऊन एसरने नेहमीच काही पाऊले पुढे नेत कायमच योग्य डिझाईन आणि सर्वोत्तम गेमिंग अनुभव उपलब्ध करून देण्याची खातरजमा केली आहे