Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Amazon Great Republic Day सेल होणार सुरु, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार...

Amazon Great Republic Day सेल होणार सुरु, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार वस्तू

Amazon Great Republic Day सेलमध्ये कशावर ऑफर्स असणार जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

ई-कॉमर्स वेबसाईट Amazon Indiaने ग्रेट रिपब्लिक डे (Great Republic Day) सेलची घोषणा केली आहे. २० जानेवारीपासून ते २३ जानेवारीपर्यंत Amazonचा Great Republic Day सेल असणार आहे. यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशन ब्यूटी, होम किचन, टीव्ही आणि घरात रोजच्या वापरात असणाऱ्या सामानावर बंपर डिस्काउंटसोबत शानदार ऑफर असणार आहे. माहितीनुसार, रिपब्लिक डे सेल Amazon प्राईम मेंबर्मसाठी १९ जानेवारीपासून सुरू होईल. या Amazonच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलबद्दल जाणून घ्या.

बँककडून मिळणार ऑफर

- Advertisement -

Amazonच्या या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये एसबीआय (SBI) बँकेकडून क्रेडिट कार्ड होल्डर्सला १० टक्के डिस्काउंट दिले जाईल. याशिवाय सेलमधील उपलब्ध प्रोडक्ट नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकेल.

दररोज वापरात येणाऱ्या वस्तूंवर ऑफर

- Advertisement -

या रिपब्लिक डे सेलमध्ये ४० हजारांहून अधिक घरात दररोज वापरात असलेल्या वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या जातील. या वस्तू ग्राहक ९९ रुपये किमतपासून खरेदी करू शकतील. याशिवाय सेलमध्ये फॅशन प्रोडक्टवर ८० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

कमी किमतीत उपलब्ध होणार स्मार्टफोन

Amazonच्या या सेलमध्ये कमी किमतीत स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. या सेल दरम्यान ग्राहक ४ हजार ९९९ रुपये किमतीपासून स्मार्टफोन खरेदी करू शकतील. याशिवाय ग्राहकांना जवळपास सर्व डिव्हाईसवर नो-कॉस्ट ईएमआयची ऑफर मिळणार आहे.

किचन आणि होम प्रोडक्टवर ऑफर

या धमाकेदार सेलमध्ये किचन आणि होम प्रोडक्ट ७९ रुपयांपासूनच्या उपलब्ध आहेत. याशिवाय सेलमध्ये कुकवेअर प्रोडक्ट १४९ रुपयांपासून उपलब्ध असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि एक्सेसरीज ऑफर

४ हजारांहून अधिक इलेक्ट्रॉनिक आणि एक्सेसरीज वस्तू या सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत. यादरम्यान ग्राहक १९९ रुपयांपासून या वस्तू घेऊ शकतात. याशिवाय सेलमध्ये बुक, खेळणी आणि व्हिडिओ गेमवर ७० टक्क्यांहून अधिक डिस्काउंट दिले जाईल.


हेही वाचा – यामुळे टेस्लाला २ कोटीच्या १ लाख ५८ हजार कार फॅक्टरीत परत घ्यावा लागणार!


 

- Advertisement -