आयफोन झाले स्वस्त; वाचा किंमत

तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आजपासून अॅमेझोन इंडियावर आयफोन फेस्ट सेलला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही जर आयफोन खरेदी केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे.

Mumbai
amazon india apple fest sale offer on iphone and other apple products
सुवर्णसंधी! कमी किंमतीत खरेदी करा आयफोन

आयफोनचा मोठा चाहता वर्ग आहे. विशेष करुन तरुणांमध्ये आयोफोनची मोठी क्रेझ आहे. या सर्वांसाठी खुशखबर आहे. आजपासून अॅमेझोन इंडियावर आयफोन फेस्ट सेलला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आयफोनचे वेगवेगळे मॉडेल्स, आयपॅड मॉडेल्स आणि अॅपलच्या इतर वस्तूंवर डिस्काउंट मिळणार आहे. आजपासून अॅमेझोन इंडिया या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर अॅपल फेस्ट सेल सुरु झाला आहे. हा सेल २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान असणार आहे. या सात दिवसांच्या सेलमध्ये डिस्काउंटसोबतच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अॅमेझोनने या सेलसाठी आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियासोबत पेमेंट संदर्भात करार केला आहे. या सेलमध्ये आयफोन एक्स, आयफोन 6 एस आणि अॅपल वॉच सिरीज 3 वर डिस्काउंट दिले जात आहे.

जाणून घ्या काय आहेत ऑफर

या अॅपल फेस्टमध्ये आयफोन एक्सची खरेदी किंमत ७३,९९९ इतकी झाली आहे. या आयोफोनची खरी किंमत ९१,९०० इतकी आहे. यासोबतच आयफोन 6 एस या स्मार्टफोनची खरेदी किंमत २७,९९९ रुपये इतकी झाली आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत २९,९०० इतकी आहे. त्याचबरोबर आयफोन एक्सएस मैक्स, आयफोन एक्सएस, आयफोन 8 प्लस, आयफोन ८ आणि आयफोन 7 या स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुरु झाली आहे. या ऑफरमध्ये आयफोन एक्सआर या स्मार्टफोनची किंमत ६७, ९९९ इतकी झाली आहे. आयपॅडच्या ६ व्या सीरीजसाठी अॅपलने ऑफर दिली आहे. या आयपॅडची खरेदी किंमत सध्या २४,९९० रुपये इतकी करण्यात आली आहे. या आयपॅडची खरी किंमत २८,००० रुपये इतकी आहे. यासोबतच अॅपलच्या मॅकबुकवरही १५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच तीन महिने नो कॉस्ट ईएमआयची ऑफर सुरु झाली आहे. अॅपलची वॉच सिरीज 3 ची किंमत २३,९९० रुपये इतकी करण्यात आली आहे. या वॉचची खरी किंमत २८, ९०० रुपये इतकी आहे. अॅपलच्या वॉच खरेदीवर ९ महिने नो कॉस्ट ईएमआयची ऑफर सुरु झाली आहे.