आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला मिळणार Amazon Alexaवर!

amitabh bachchan alexa voice experience next year
आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला मिळणार Amazon Alexaवर!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी Amazon सोबत पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत भारतात पहिल्यांदा Alexa सेलिब्रिटी आवाजात उपलब्ध होणार आहे. Amazon India च्या माहितीनुसार, भारतात आता अमिताभ बच्चन यांचा आवाज Alexaवर ऐकायला मिळणार आहे.

पहिल्यांदा Amazonच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसने Amazon Alexaसाठी भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. या Amazon Alexaच्या नवीन फीचरचे नाव ‘बच्चन Alexa’ ठेवण्यात आले आहे. २०२१पासून ‘बच्चन Alexa’ ग्राहकांना वापरता येणार आहे.

‘बच्चन Alexa’ च्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या आवाजात, कविता, हवामानसंदर्भातील माहिती आणि जोक ऐकता येणार आहेत. ‘बच्चन Alexa’ ऐकण्यासाठी ग्राहकांना काही पैसे मोजावे लागणार आहे. पण अधिकृतपणे Amazonने किती पैसे मोजावे लागणार आहे याबाबत सांगितले नाही आहे. ही सुविधा Activate करण्यासाठी “Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan” अशी व्हाइस कमांड द्यावी लागणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी Amazonशी करार केल्यानंतर सांगितले की, ‘मला नेहमीच तंत्रज्ञानामुळे नवीन गोष्टींसोबत जोडण्याची संधी दिली. या नवीन तंत्रज्ञानामुळे मला आणखी लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. याचा मला आनंद आहे.’


हेही वाचा – OnePlus 8T ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स