अॅपलच्या ‘या’ महागड्या उत्पादनामध्ये बिघाड

Iphone X च्या स्क्रीन टचमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. काही मोबाईलची स्क्रीन तर अत्यंत संवेदनशील झाली असून ग्राहकांना फोन नीट हाताळताही येत नाही. त्यामुळे आता आयफोन मोफत फोनची दुरुस्ती करून देणार आहे.

Mumbai
Apple-iPhoneX
अॅपल आयफोन एक्स

अॅपल फोनने आपले सगळेच उत्पादन नेहमीच थाटामाटात लाँच केले आहे. मात्र सर्वात जास्त हवा होती ती अॅपलच्या Iphone X या मॉडेलची. याची किंमत इतकी महाग असूनही जगभरामध्ये हा फोन बरेच लोक विकत घेत आहेत. मात्र थोड्याच दिवसात आता या महागड्या फोनबाबत कंपनीकडे ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

काय आहे समस्या?

आयफोनच्या या Iphone X मध्ये विकल्या गेलेल्या युनिट्समध्ये टच स्क्रिनची मोठी समस्या निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर स्वतः आयफोन कंपनीनेदेखील हे मान्य केले आहे. Iphone X च्या स्क्रीन टचमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. काही मोबाईलची स्क्रीन तर अत्यंत संवेदनशील झाली असून ग्राहकांना फोन नीट हाताळताही येत नाही. तर काही फोनमध्ये स्क्रीनला टच न करताही अनेक अॅप्लीकेशन अचानकपणे सुरुदेखील होत आहेत. तर काही फोनमध्ये टच करूनही फोन सुरु होत नाही. दरम्यान आता ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यामुळे कंपनीने फोनची स्क्रीन मोफत बदलून देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आपल्या १३ इंची मॅकबुक प्रोमध्येही काही त्रुटी असल्याचे कंपनीने मान्य केले असून ग्राहकांचा डेटा यामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे जून २०१७ ते जून २०१८ या वर्षभरात जे लॅपटॉप विकले गेले आहेत. त्यामध्ये काहीही समस्या आढल्यास, कंपनी कोणतेही शुल्क न आकारता हे लॅपटॉप दुरुस्त करून देणार आहे.

अॅपलची उत्पादने महाग

अॅपल या कंपनीची उत्पादने इतर कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा महाग आहेत. पण त्याचा दर्जा चांगला असल्यामुळे बरेच ग्राहक याला प्राधान्य देतात. त्यामुळेच २०१८ मध्येही सर्वोत्तम जागतिक ब्रँड हा मान अॅपलला मिळाला आहे. मात्र आता या फसवणुकीमुळे अॅपलच्या उत्पादनांमध्ये काही फरक पडतो का हे पाहावं लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here