गुड न्यूज! अॅपलचा ‘हा’ फोन झाला स्वस्त

अॅपल कंपनीने iphone 11 सीरिजचे तीन फोन लाँच केले. हे तीन फोन लाँच केल्यामुळे जुन्या आयफोनच्या किंमतीवर परिणाम झाला.

Mumbai
apple iPhone XR gets an official price cut in India after effect of iphone 11
गुड न्यूज! अॅपलचा 'हा' फोन झाला स्वस्त

मंगळवारी खूप प्रतिक्षेत असणारा iphone 11 सीरिजचे तीन फोन अॅपल कंपनीने कॅलिफोर्नियातील एका खास इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. या इव्हेंटमध्ये कंपनीने iphone 11, iphone 11 pro आणि iphone 11 pro Max हे फोन लाँच केले. तसेच या दरम्यान आयफोनच्या तीन सिरिजसह आयपॅड आणि अॅपल वॉचची देखील घोषणा करण्यात आली आहे. कंपनी जेव्हा नवीन फोन लाँच करते तेव्हा जुन्या फोनची किंमत कमी करते. त्याचप्रमाणे आयफोन कंपनीने देखील केले आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला iphone XR ची किंमत आता कपात होणार आहे.

iphone XR या फोनच्या किंमतीत २७ हजार रुपयांची कपात झाली आहे. अॅपलच्या संकेतस्ठळावर iphone 11 सीरिज लाँच होईपर्यंत iphone XR ची किंमत ७६ हजार ९०० रुपायांना लिस्टेड होता. पण आता iphone XR ची किंमत कपात झाल्याने अवघ्या ४९ हजाप ९९० रूपयांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळावर लवकरच ही किंमत अपडेट होणार आहे.

भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अॅपल कंपनीचा एक दिवसापूर्वीच लाँच झालेला हा नवा iphone उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला भारतात iphone 11 ची व्हेरिअंटची किंमत ६४ हजार ९०० रूपये आणि iphone 11 pro व्हेरिअंटची किंमत ९९ हजार ९०० तर iphone 11 pro Max व्हेरिअंटची किंमत १ लाख ९ हजार ९०० रूपये असणार आहे.