घरटेक-वेकआयफोन ११ लाँच झाल्यानंतर जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत घट

आयफोन ११ लाँच झाल्यानंतर जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत घट

Subscribe

आयफोनच्या किंमतीत घट केल्याने ग्राहकांना आयफोन २० हजार रूपयांनी मिळणार स्वस्त

आताच खूप प्रतिक्षेत असणाऱ्या आयफोन ११ सिरिजचे तीन फोन लाँच करण्यात आले. अॅपलने आपल्या आयफोन सिरिजमधील आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे फोन लाँच केले आहे. मात्र आयफोन ११ लाँच झाल्यानंतर अॅपलनं त्यांच्या जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे.

भारतात आयफोन ११ ची सुरूवातीची किंमत ६४,९९० रूपये इतकी आहे. मात्र कंपनीने आता आयफोन ७ ते आयफोन एक्सपर्यंतच्या किंमतीत चांगलीच घट केली आहे.  या फोनच्या किंमतीत घट केल्याने ग्राहकांना आयफोन २० हजार रूपयांनी स्वस्त मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- आयफोन ११ सिरिजचे ३ फोन लाँच; ‘हे’ आहेत फिचर्स


आपली पकड कायम राखण्यासाठी कंपनीने आयफोनच्या किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सॅमसंग आणि वनप्लसच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

काउंटरपॉइंटने केलेल्या संशोधनानुसार २०१८ मध्ये अॅपल आयफोनच्या विक्रीत घट होऊन १७ लाख युनिट पर्यंत पोहचली होती. तर, २०१७मध्ये विक्री ३२ लाख इतकी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -