Apple सुद्धा फोल्डेबल स्मार्टफोन आणणार, यासाठी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार!

apple may launch foldable smartphone as company reportedly orders samsung display
Apple सुद्धा फोल्डेबल स्मार्टफोन आणणार, यासाठी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार!

सॅमसंग (samsung)नंतर आता Apple फोल्डेबल डिस्प्लेसह स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. पण माहितीनुसार, अमेरिकन टेक कंपनी Apple सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले खरेदी करीत आहे.

मॅक्रूमर्स (Macrumors)च्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात, Apple फोल्डेबल डिस्प्ले सॅपल म्हणून सॅमसंगकडून खरेदी करणार आहे. असे पहिल्यांदा होत नसून यापूर्वी Appleने सॅमसंगकडून OLED पॅनल खरेदी केले आहेत. लोकप्रिय टिप्स्टर, जे सहसा अँड्रॉइडवर आधारित इंडस्ट्रीच्या बातम्या लीक करते, ते म्हणाले की, Appleने OLED फोल्डेबल स्क्रीनसाठी सॅमसंगला ऑर्डर केली आहे.

Iceuniverseच्या म्हणण्यानुसार, Apple सध्या असा आयफोन तयार करत आहेत जो Galaxy Z Fold सारखा फोल्ड केला जाऊ शकेल. ही पोस्ट त्यांनी चीनी सोशल मीडियावर केली असून तिथे लिहिले आहे की, ‘एक वर्षासाठी सॅमसंगकडे फोल्डेबला डिस्प्लेसाठी ऑर्डर दिली आहे.’

सॅमसंगने आतापर्यंत दोनपेक्षा अधिक फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच केले असून अलीकडेच कंपनीने Galaxy Z Fold 2 देखील बाजारात लाँच केला आहे. त्यामुळे आता सॅमसंगकडे फोल्डेबल डिस्प्लेबाबतचा अनुभव आहे.

Apple फोल्डेबल डिस्प्ले असणार्‍या स्मार्टफोनवर काम करत असल्याचे गेल्या वर्षीच्या एका अहवालात देण्यात आले होते. फोल्डिंग आयफोनचा पेटेंट स्पॉट झाला होता. Apple च्या फोल्डेबल आयफोन संदर्भात इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काहीजण म्हणतात की, Apple देखील Galaxy Z Foldसारखा फोल्डेबल फोन आणेल, तर काही लोक म्हणतात की, कंपनी सर्फेस ड्युओ सारख्या दोन डिस्प्लेसह स्मार्टफोन लाँच करू शकते.


हेही वाचा – तब्बल 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत