घरटेक-वेकभारतात Apple लॉंच करणार Apple TV+; नेटफ्लिक्सला मिळणार टक्कर

भारतात Apple लॉंच करणार Apple TV+; नेटफ्लिक्सला मिळणार टक्कर

Subscribe

अॅपल कंपनीच्या Apple Tv+ सुविधा नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनला स्पर्धा देणारी ठरणार आहे. या सर्व सेवांचा सामना विशेष करून Netflix आणि Hulu यांसारख्या सेवांशी राहणार आहे.

Apple कंपनीने सोमवारी आपल्या स्टार-पॅक्ट ओरिजनल व्हिडिओ सर्विसचा खुलासा केला आहे. त्याचसोबत कंपनीने मॅगझिन आणि वृत्तपत्रासाठी सब्ससिक्रिप्शनचे योजना देखील तयार केली आहे. यापुढे अॅपल कंपनी डिजिटल स्वरूपाच्या काम करण्याच्या पद्धतीवर अधिक भर देणार आहे. याशिवाय, अॅपल कंपनीने मोबाईल आणि अन्य उपकरणांसाठी एअर गेम सब्सक्रिप्शन Apple Arcade सुद्धा सादर करण्यात आला.

- Advertisement -

या कार्यक्रमादरम्यान डायरेक्चर स्टीवन स्पीलबर्ग यांच्यासह टीव्ही होस्ट Orpah Winfrey आणि हॉलिवूड स्टार जेनिफर एनिस्टसह अन्य कलाकार उपस्थितीत होते. अॅपल कंपनीच्या Apple Tv+ सुविधा नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनला स्पर्धा देणारी ठरणार आहे. या सर्व सेवांचा सामना विशेष करून Netflix आणि Hulu यांसारख्या सेवांशी राहणार आहे. अॅपल टीव्ही प्लस एक ऑन डिमांड, अॅड फ्री सर्विस असून यावर्षी १०० देशात लॉन्च केला जाणार आहे. या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

तसेच कंपनीने कार्यक्रमादरम्यान एक नवीन अॅपल न्यूज प्लस सेवासुद्धा लॉन्च केली आहे. त्यासाठी ग्राहकांना महिन्याकरिता ९.९९ डॉलर मोजावे लागणार आहेत. यामध्ये वॉल स्ट्रिट जर्नल, डिजिटल न्यूज वेबसाईट आणि रोलिंग स्टोन, टाईम, वायर्ड व द न्यूयॉर्कर सारखे ३००हून अधिक मॅगझिन उपलब्ध होणार आहेत.

Apple News+ ग्राहकांच्या फायद्याचे

अॅपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी या सोहळ्या दरम्यान सांगितले की, Apple News+ हे प्रकाशकांसह ग्राहकांच्या देखील फायद्याचे ठरणार आहे. सोमवारी Apple News+ ला यूए आणि कॅनडामध्ये इंग्रजी तसेच फ्रेंचमध्ये लॉंच झाले आहे. यासोबत, वर्षाच्या अखेर पर्यंत ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय, कंपनीने असेही सांगितले की, यावर्षी Apple Arcade नावाच्या नवीन गेमची सदस्यता सुरू करणार आहे. ही गेम सेवा १५० देशांमध्ये उपलब्ध केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -