या फोनवर ८ हजारांची ‘बंपर सूट’

आसुस या कंपनीच्या झेनफोन ५ झेडवर 'बंपर सूट' आहे. त्यामुळे हा फोन लवकरच खरेदी करा.

Delhi

मोबाईल युजर्सकता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आसुस कंपनीने ‘आसुसच्या’ फोनवर तब्बल ८ हजारांची सूट दिली आहे. फ्लिपकार्ट आसुस डेज सेल सुरु केला आहे. आज या सेलचा अखेरचा दिवस आहे. आसुसने फ्लॅगशीप स्मार्टफोन झेनफोन ५ झेडवर तब्बल ८ हजारांची सूट दिली आहे. ३२ हजार ९९९ रुपयांचा फोन आता २४ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

बंपर सूट

आसुसने तीन दिवसांच्या या सेलमध्ये बंपर सूट दिली आहे. आसुसने झेनफोन ५ झेड गेल्यावर्षी जुलैमध्ये लॉंच करण्यात आला होता. मात्र ही पहिल्यांदा एवढी मोठी बंपर सूट दिली आहे. या फोनची किंमत ३६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र आता हा फोन २८ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.

Zenfone 5 Z ची वैशिष्ट्ये

  • ६.२ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी स्क्रीन
  • ९० टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो
  • स्नॅपड्रॅगन ८४५ ऑक्टाकोर चिपसेट
  • हँडसेट ऑल ग्लास यूएनबॉडी जिझाइन
  • १२ मेगापिक्सल प्रायमरी ८ मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा
  • पीडीएएफ, ओआयएस, ईआयएस, ४ के यूएचडी व्हिडिओ रेकॉर्डिं सपोर्ट
  • ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी
  • अनलॉक फीचर

वाचा – ‘हे’ App खातात जास्त फोनची बॅटरी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here