घरटेक-वेकWhatsapp ला टक्कर देणारे हे स्वदेशी ॲप बंद, कारण?

Whatsapp ला टक्कर देणारे हे स्वदेशी ॲप बंद, कारण?

Subscribe

कोट्यावधी वापकर्त्यांना मोठा धक्का

भारतीय बनावटीचे आणखी एक इंस्टंट चॅट मेसेंजर बंद करण्यात येणार आहे. हे ॲप बंद करत असल्यामुळे लाखो वापरकर्ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. २०१२ मध्ये सुरु करण्यात आलेले Hike Sticker Chat App आता बंद करण्यात येत आहे. ज्यामुळे भारतीय वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. जेव्हा हाईक भारतात सुरु करण्यात आले तेव्हा या ॲपने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तसेच नव्या उंचीवर पोहोचले होते. परंतु एका काळानंतर हाईकची लोकप्रियता कमी होऊ लागली. याचे कारण परदेशी चॅट मेसेंजर व्हॉट्सॲप होते. व्हॉट्सॲपने जगभरात एक लोकप्रियतेत एक अनोखी उंची गाठली आहे. यामुळे हाईकची लोकप्रियता कमी झाली आहे.

भारतीय वापरकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे आणि वापर न केल्यामुळे हाईक बळी ठरला आहे. स्टिकरच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी हाईकची निर्मिती केली होती. सुरुवातीला हाईकचे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते होते. परंतु व्हॉट्सॲप आल्यानंतर हाईकची प्रचिती ढासळण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

हाईक मॅसेंजर ॲपचे सीईओ केविन भारती मित्तल यांनी ट्विटरवर ६ जानेवारी रोजी अशी घोषणा केली की, आम्ही जानेवारी २१ रोजी हाईक स्टीकर चॅट बंद करणार आहोत. आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही इथवर पोहचू शकलो नसतो. अशा आशयाचे ट्विट करत ॲपचे सीईओ कोविन भारती मित्तल यांनी हाईक बंद करण्याचे संकेत दिले होते.

- Advertisement -

मात्र, हाईक मेसेंजर ॲप बंद करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीकडून अधिकृतरित्या कारण जाहीर करण्यात आले नाही. परंतु हे ॲप बंद झाल्यानंतर वापरकर्ते आपला कोणाताही डेटा गमावणार नाहीत. डेटासाठी पर्यायी ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे. तसेच हाईकला पर्यायी ॲप म्हणून वाईब(Vibe) आणि रश (Rush) या ॲपचा वापर करण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

हाईक स्टिकर्स चॅटची निर्यात करा

आपल्या ईमेलवर आता हाईक ॲप बंद केला जात आहे, आपण आपला हाइक चॅट डेटा आणि इतर डेटा ईमेलवर देखील जतन करू शकता. यासाठी वापरकर्त्यांना एक्सपोर्ट चॅट्स ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याकडे आपला नोंदणीकृत नंबर विचारला जाईल, ज्यावर ओटीपी येईल. यानंतर, वापरकर्त्यांकडून ईमेल आयडीची माहिती विचारली जाईल आणि हे दिल्यावर, वापरकर्त्यांनी आपल्या ईमेलवर सर्व डेटा जतन करू शकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -