बजाजने ‘ही’ स्वस्त पल्सर केली लाँच

bajaj pulsar 125 neon launched in india priced at ₹ 64,000
बजाजने 'ही' स्वस्त पल्सर केली लाँच

बजाज कंपनीने एक नवीन पल्सर लाँच केली आहे. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बजाज ऑटोने पल्सरच्या दुनियेत अजून एक नवीन पल्सर लाँच केली आहे. Pulsar 125 Neon ही बाइक बजाज कंपनीने भारतीय बाजारात आणली आहे. Pulsar 125 Neon ही बाइक दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच केली आहे. ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाइक आहे. आतापर्यंतची बजाज कंपनीच्या पल्सरमधील सर्वात स्वस्त बाइक आहे. बजाज ऑटोचे अध्यक्ष असे म्हणाले की, ‘शानदार परफॉर्मन्स आणि आकर्षक स्टाइलसह कमी किंमतीत स्पोर्टी मोटरसायकल खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांचा विचार करून ही नवीन बाइक बाजारात आणली आहे.’

दिल्ली एक्स-शोरुममध्ये पुढीलप्रमाणे किंमत आहे. या बाइकच्या डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत ६६ हजार ६१८ रुपये असून ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत ६४ हजार आहे.

 

Pulsar 125 Neonच्या डिस्क व्हेरिअंटमध्ये पुढील बाजूला 240 mm डिस्क ब्रेक आहे. तसेच ड्रम ब्रेक व्हेरिअंटमध्ये मागील बाजूला 130 mm तर पुढील बाजूला 170 mm ड्रम ब्रेक आहे. या नवीन पल्सरमध्ये 125 cc क्षमतेचं DTS-i इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 11.8 bhpची ऊर्जा आणि 6,500 rpm वर 11 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. या बाइकचे वजन १४० किलोग्रॅम आहे. तसेच ५-स्पीड गिअरबॉक्स आहेत.