घरटेक-वेक१० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत 'हे' जबरदस्त स्मार्टफोन

१० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन

Subscribe

जर तुम्हाला परवडणार स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर मग ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आज तुम्हाला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेले काही निवडक आणि खास स्मार्टफोनविषयी सांगणार आहोत, ज्यांची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी, प्रोसेसर आणि शानदार डिस्प्ले मिळेल. तर चला मग पाहूया १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेले स्मार्टफोन…

Lava Z61 Pro

- Advertisement -

सॅमसंग, शाओमी आणि व्हिवो सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Lava ने Z61 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Z61 Pro या स्मार्टफोनची किंमत ५ हजार ७४४ रुपये आहे. युजर्सना या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचचा डिस्प्ले, ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 3,100mAh ची बॅटरी मिळले.

Samsung Galaxy M01

- Advertisement -

सॅमसंगने जूनमध्ये Galaxy M01 लाँच केला. या स्मार्टफोनच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.७१ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 720×1560 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर आणि 4,000mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप मिळाला आहे, ज्यामध्ये 13MP ची प्राइमरी सेंसर आणि दुसरा 2MP लेंस आहे. तसेच या स्मार्टफोनच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.

Redmi 9 Prime

जर तुम्ही १० हजारपेक्षा कमी किंमतीत एक शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Redmi 9 Prime हा स्मार्टफोन निवडू शकता. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनध्ये 6.53 इंचचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ जी 80 प्रोसेसर,13MP+8MP+5MP+2MP कॅमरा सेटअप, 8MP चा सेल्फी कॅमेरा आणि 5,020mAhची बॅटरी मिळेल.

Realme Narzo 10A

Realme Narzo 10A हा बजेटच्या रेंजमधील एक दमदार स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ जी ७० चिपसेट, 12MP+2MP कॅमेरा सेटअप, 5MP कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी मिळेल.


हेही वाचा – फेसबुकने कोरोना संबंधित ७० लाख पोस्ट केल्या डिलीट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -