१५ हजार रुपयांमध्ये ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करा

best smartphones under rs 15000
१५ हजार रुपयांमध्ये 'हे' जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करा

१५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आपण नेहमी अनेक नवीन स्मार्टफोन बघत असतो. या दरातील रेंजवर रिअलमी (Realme) आणि शाओमीन (Xiaomi)च्या स्मार्टफोनने कब्जा केला होता. कंपनीने यापूर्वी काही स्मार्टफोन बाजारात आणाले जे त्यांच्या किंमतीनुसार चांगले मुल्य देत होते. पण आता मोटोरोला (Motorola)ने एक दमदार स्मार्टफोन लाँच करून नाणे पलटवले आहे. या कंपनीचा मोटो जी९ (Moto G9) हा स्मार्टफोन दोन्ही चीनी कंपनीच्या स्मार्टफोनला चांगलीच टक्कर देत आहे. पण आज आम्ही तुम्हाला १५ हजार रुपयातले बेस्ट स्मार्टफोन बद्दल माहिती देणार आहोत.

रिअलमी ७ (Realme 7)

रिअलमी ७ मधली विशेष गोष्ट म्हणजे यातील चिपसेट, मोठी बॅटरी आणि नवीन प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. यामध्ये नवीन डिझाईन देखील दिली गेली आहे. यामुळे रिअलमी ६ च्या तुलनेत हा स्मार्टफोन खूपच भारी आहे. मोठी बॅटरी असल्यामुळे फोनचे वजन थोडे जास्त आहे. रिअलमी ७ मोठा आणि वजनदार स्मार्टफोन आहे. बाकी सर्व फीचर्स हे रिअलमी ६ प्रमाणे आहे. तसेच चांगल्या चिपसेटमुळे रिअलमी ७ वापरणे अधिक वेगवान आहे. गेमिंग परफॉर्मेंस देखील चांगला आहे. डिस्प्लेमध्ये चांगली ब्राइटनेस आहे. रिअलमी ७ ची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.

मोटोरोला मोटो जी ९ (Motorola Moto G9)

मोटोरोला मोटो जी९ हा स्मार्टफोन बाजारात येणारा भारत हा पहिला देश आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडचे एक व्हर्जन आहे. ज्याला मोटोरोला आता MyUX म्हणते. स्मार्टफोन देखील थोडा मोठा असून वजनदार आहे. हा काही स्मार्टफोन पैकी एक आहे ज्यामध्ये स्वतंत्र गूगल असिस्टेंट बटण आहे. हा भारतातील पहिला फोन आहे ज्यामध्ये नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेटचा समावेश केला आहे. यामुळे स्मार्टफोनमधले कोणतेही काम चांगल्या प्रकारे हाताळता येते. या स्मार्टफोनची किंमत १२ हजार रुपये आहे.

रेडमी नोट ९ (Redmi Note 9)

रेडमी नोट ९ या स्मार्टफोनचे डिझाईन ही रेडमी नोट ९ प्रो आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्सप्रमाणे आहे. हा स्मार्टफोन ६.५३ इंच डिस्प्ले आणि पंच होल फ्रंट कॅमेरा डिझाईनसोबत येता. फोनच्या पॅनेलला सुरुवातीपासूनच स्क्रॅच पडू नये यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये जाड बॉर्डर दिले गेले आहेत. रेडमी नोट ९ ची किंमत आता ११ हजार ९९९ रुपये आहे.

रिअलमी ६आय (Realme 6i)

रिअलमी ६आय स्मार्टफोन रिअलमी ६चा टोनडाऊन व्हर्जन आहे. या व्हर्जनमध्ये रिअलमी ६चे प्रमुख हार्डवेअर समाविष्ट आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले, पंच होल डिझाइन दिली गेली आहे. तसेच फोनला एक साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. रिअलमी ६आयमध्ये प्लास्टिक बॉडी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.

सॅमसंग एम २१ (Samsung Galaxy M21)

सॅमसंग गॅलक्सी एम २१ ची किंमत गॅलेक्सी एम ३० एस पेक्षा कमी ठेवली आहे. या स्मार्टफोनचे दमदार फीचर्स आहे. AMOLED डिस्प्ले, चांगली बॅटरी लाइफ आणि डिसेंट App परफॉर्मेंस इत्यादींचा या स्मार्टफोनमध्ये समावेश आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १०वर आधारित सॅमसंगच्या वन यूआई २.० इंटरफेसवर चालत आहे. यात Exynos 9611 चिपसेट काम करते. जे सर्वात जबरदस्त आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम२१ मधील ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.