WhatsApp स्टेटस व्हिडीओ ‘असा’ करा डाऊनलोड…

Mumbai
WhatsApp status video

व्हॉट्सअॅप हे सर्वांच्याच गळ्यातलं ताईत बनलं आहे. सुरुवातीला केवळ चीट-चॅटिंग पुरतं मर्यादित असलेलं व्हॉट्सअॅप आता व्यावसायिक पातळीवरही वापरलं जातं. नुकतंच बँकांनीही व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे खासगी वापरापासून ते व्यावसायिक वापरापर्यंत व्हॉट्सअॅपचाच बोलबाला आहे. २०१७ साली इनस्टाग्रामप्रमाणे Whatsapp नेही स्टेटस स्टोरीचं फिचर लाँच केलं. लोकांनीही फिचरला भरभरुन पसंती दिली. बरचेदा आपल्या ओळखीच्या लोकांनी स्टेटसवर अपलोड केलेला व्हिडीओ आपल्याला फारच आवडतो. मात्र, स्टेटस स्टोरीमधला व्हिडीओ डाऊनलोड करता येत नसल्यामुळे आपण नाराज होतो. मात्र, आता तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटसमधला व्हिडीओ डाऊनलोड करता येणार आहे.

Whatsapp स्टेटस व्हिडीओ.. असा करा डाऊनलोड

  • जेव्हा आपण एखाद्याची व्हॉट्सअॅपवर स्टोरी पाहतो, त्यावेळी आपोआप ती आपल्या फोनमध्ये डाऊनलोड होत असते.
  • ती स्टोरी फोनमध्ये असलेल्या statuses या फोल्डरमध्ये सेव्ह होत असते. मात्, हे फोल्डर हिडन असल्यामुळे आपल्याला मोबाईल गॅलरीमध्ये ती दिसत नाही.

  • मात्र, स्टोरी पाहण्यासाठी तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये जाऊन ते फोल्डर ‘अनहाइड’ करु शकता. एकदा तुम्ही हे फोल्डर अलहाईड केले की, तुम्ही कोणाचीही स्टोरी तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकाल.

  • फोल्डर अनहाईड करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल स्टोरेजमध्ये जाऊन व्हॉट्सअॅपवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूच्या सेटिंगवर जाऊन ‘Show Unhide Files’ वर क्लिक करा.

  • याशिवाय, प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या Story Saver for WhatsApp  या आणि अशा अन्य काही अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला आवडलेलं  WhatsApp स्टेटस डाऊनलोड करु शकता.