१८ सप्टेंबरपासून Flipkart वर बिग सेव्हिंग डे सेल; १ रुपयात करता येणार प्री-बुकिंग

Big Saving Day Sale

Flipkart वर पुन्हा एकदा बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. यावेळी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही आणि Accessories सारख्या बर्‍याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट व आकर्षक ऑफर देण्यात येणार आहेत. तसंच, १ रुपयात प्री-बुकिंग करता येणार आहे.

ही प्री-बुकिंग ऑफर १५ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान वैध असेल. SBI कार्ड वापरकर्त्यांना कार्ड किंवा ईएमआयवर सवलतीत मिळू शकतात. फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये असलेल्या वस्तूंची यादी जाहीर केलेली नाही. मात्र, मोबाइल फोन आणि टॅब्लेटची इच्छा असलेले ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय योजना, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेवू शकतात. बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान तीन कोटीहून अधिक इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीज नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

विक्रीदरम्यान ग्राहकांना माऊस, कीबोर्ड, पॉवर बँक, केबल्स आणि हेडफोन्स सारख्या अ‍ॅक्सेसरीजवर आकर्षक सूटही मिळणार आहे. याशिवाय एसबीआय कार्ड वापरणारे एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर १० टक्के त्वरित सूट मिळणार आहे. प्री-बुकिंग १५ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या होमपेजवरील प्री-बुक स्टोअरमध्ये जावं लागेल. येथून, ग्राहक १ रुपया देऊन त्यांचे आवडते उत्पादन ब्लॉक करु शकतील. यानंतर उर्वरित रक्कम १८ सप्टेंबर ११:५९ पर्यंत द्यावी लागेल.