घरटेक-वेकBSNL ने आणला १४७ नवा प्लॅन, मिळेल 10GB डेटा

BSNL ने आणला १४७ नवा प्लॅन, मिळेल 10GB डेटा

Subscribe

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL)ने ग्राहकांना भेट म्हणून १४७ रुपयांचा नवा व्हाऊचर आणला आहे. चेन्नई सर्कलमध्ये हा आलेला व्हाऊचर इतर सुविधांसोबत 10GB डेटा देईल. कंपीनने नवीन प्लॅन व्यतिरिक्त काही व्हाऊचरवर अतिरिक्त वैधता (व्हॅलिडिटी)ची ऑफर केली आहे. एवढेच नसून बीएसएनएलने काही व्हाऊचर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पतंजली प्लॅनचा देखील समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ‘युजर्सना नवीन प्लॅन आणि अतिरिक्त वैधतेचा फायदा १ ऑगस्ट २०२० पासून मिळेल. तसेच हटविलेले प्लॅन ३१ जुलैपासून बंद केले गेले आहेत.’

काय १४७ रुपयांचा प्लॅन?

- Advertisement -

या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. याशिवाय ग्राहकांना 10GB डेटा मिळेल. प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. ज्यामध्ये ट्यून्सची सुविधा मोफत मिळत आहे. सध्या हा प्लॅन चेन्नई सर्किलमध्येच लागू करण्यात आली आहे.

‘या’ प्लॅनवर वाढवली वैधता

- Advertisement -

कंपनीने सांगितले की, ‘१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान १९९९ रुपयांच्या प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ७४ दिवस अतिरिक्त वैधता मिळेल. प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 3GB डेटा मिळत आहे. अतिरिक्त वैधता मिळल्यावर ग्राहकांना ४३९ दिवस हा प्लॅनचा वापर करू शकता. याव्यतिरिक्त कंपनीने २४७ रुपयांच्या प्लॅनची वैधता ६ दिवस वाढवली आहे. ज्यामध्ये ३० दिवसांसाठी 3GB डेटा मिळतो.’

कंपनीने म्हटले आहे की, ‘आता २४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये Eros Now सर्व्हिसचा एक्सेस दिला जाईल. त्याचप्रमाणे ८१ दिवसांच्या वैधतेसह ४२९ रुपयांच्या प्लॅनसोबत देखील Eros Now सर्व्हिसचा एक्सेस मिळेल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -