घरटेक-वेकBSNL आता घरोघरी इंटरनेटची सुविधा देणार, लाँच केले BookMyFiber पोर्टल

BSNL आता घरोघरी इंटरनेटची सुविधा देणार, लाँच केले BookMyFiber पोर्टल

Subscribe

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL)ने लोकांपर्यंत सहजपणे इंटरनेट पोहोचवण्यासाठी कंपनीने नवीन पोर्टल ‘BookMyFiber’ लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने युजर्स नवीन फायबर कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे हे पोर्टल देशभरातील सर्व बीएसएनएल टेलिकॉम सर्कलमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे याचा मदतीने युजर्स सहजपणे इंटरनेट सेवा मिळवू शकतील.

फायबर कनेक्शनसाठी अर्ज कसा करावा?

जर तुम्ही ‘BookMyFiber’चा वापर करून नवीन फायबर कनेक्शन घेऊ इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला http://bookmyfiber.bsnl.co.in/ या वेबसाईटवरून जाऊन डिटेल्स द्यावे लागतील. ज्यामध्ये पत्ता, सर्किल म्हणजे तुमचं राज्य, पिन कोड, नाव मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी याविषयी माहिती द्यावी लागेल. याचा इंटरफेस अगदी सोपा असून याचा वापर करताना युजर्सना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. हे पोर्टल ओपन करताचा तुम्हाला नकाशा दिसले आणि डाव्याबाजूला एक बॉक्स दिसले तिथे तुम्हाला डिटेल्स भरायच्या आहेत.

- Advertisement -

फायबर प्लॅनची ​​किंमत

बीएसएनएलच्या BookMyFiber पोर्टलवर आपली डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार सुविधा आणि फायबर प्लॅन निवडू शकता. फायबर प्लॅनची सुरुवातीची किंमत ४९९ रुपये आहे आणि यामध्ये युजर्सना अनलिमिटेड डाटासह अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली आहे. याशिवाय ४२९ रुपये, ७७७ रुपये, ८४९ रुपयेपासून २ हजार ४९९ पर्यंतचे प्लॅन आहेत. बीएसएनएलने २०१९ मध्ये आपली फायबर ऑप्टिक ब्रॉडबँड सेवा सुरू केली आणि हळूहळू देशभरात उपलब्ध करून दिली. काही दिवसांपूर्वी बीएसएनएलने आपल्या युजर्सच्या सोयीसाठी ‘BSNL 22GB CUL’ हा प्लॅन लाँच केले. या प्लॅनची किंमत १ हजार २९९ रुपये आहे.


हेही वाचा – Samsung Galaxy A51 ची किंमत २ हजार रुपयांनी घटली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -