घरटेक-वेकBSNLच्या ३५ रुपयांच्या स्पेशल 'टॅरिफ प्लॅन'मध्ये ५ जीबी डेटा

BSNLच्या ३५ रुपयांच्या स्पेशल ‘टॅरिफ प्लॅन’मध्ये ५ जीबी डेटा

Subscribe

बीएसएनएलने ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केला आहे. या नव्या प्लॅननुसार युजर्सना ५ जीबीचा डेटा मिळणार असून पूर्वीपेक्षा २५ पट अधिक जास्त डेटा मिळणार आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या मोठी चढाओढ सुरु आहे. तसेच या खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वच कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा मात्र, आता ग्राहकांना चांगलाचा फायदा होऊ लागला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल कंपनीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या जुन्या प्लॅनमध्ये बदल करत केला आहे.

बीएसएनएलच्या टॅरिफ प्लॅन

बीएसएनएलने ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केला आहे. या प्लॅनमध्ये पूर्वी युजर्सना २०० एमबी डेटा मिळत होता. आता नव्या प्लॅननुसार युजर्सना ५ जीबीचा डेटा मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा २५ पट अधिक जास्त डेटा मिळणार आहे. या प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही. पूर्वीप्रमाणे प्लॅनची वैधता ५ दिवसांचीच असणार आहे.

- Advertisement -

स्पेशल टॅरिफ वाउचर

बीएसएनएलने ५३ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वाउचरमध्येही बदल करण्यात आला आहे. या प्लॅननुसार, पूर्वी युजर्सना २१ दिवसांच्या वैधतेसह २५० एमबी डेटा मिळत होता. तर नव्या प्लॅननुसार, युजर्सना ८ जीबीचा डेटा मिळणार आहे. मात्र, वैधता २१ दिवसांऐवजी १४ दिवसच असणार आहे. तर बीएसएनएलच्या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग मिळणार आहे. त्याशिवाय युजर्सना प्रत्येक दिवशी २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ७१ दिवसांची आहे. त्याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना नेट व्हॉइस कॉलवर ३ हजार मिनिटे आणि ऑफ नेट – व्हॉइस कॉल्सवर १ हजार ८०० मिनिटे मिळत होती.

९ लाख नवीन ग्राहक जोडले

बीएसएनएल सध्या वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत आहे. त्यांच्या या ऑफर्सला चांगला प्रतिसाद आहे. येत्या फेब्रुवारी २०१९मध्ये ९ लाख नवीन ग्राहक बीएसएनएलने जोडले आहेत.

- Advertisement -

वाचा – आयपीएल प्रेमींसाठी BSNL ची नवीन ऑफर, मिळणार इंटरनेट सेवाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -