घरटेक-वेकबाय बाय 'याहू' मेसेंजर!

बाय बाय ‘याहू’ मेसेंजर!

Subscribe

याहूच्या या मेसेंजरशी अनेकांच्या आठवणी आहेत. अगदी १९९८ पासून ते २०१८ पर्यंत याचा वापर करणारे देखील अनेक आहेत.आयफोनमध्ये फेस टाईम यायच्या आधी याहू मेसेंजरने व्हिडिओ कॉल हे फीचर आणले.

हल्ली सगळी तरुणाई मेसेजवरच असते. यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, हँगआऊट सारखे पर्याय आहेतच. पण या मेसेंजरमधील याहू आज आपल्या सगळ्यांना गुड बाय करणार आहे. याहूची मेसेंजर सेवा आजपासून बंद होणार आहे. याची अधिकृत घोषणा याहूने आधीच केली होती. त्यानुसार आजपासून ही सेवा बंद होणार आहे.

९० च्या दशकात क्रेझ

याहूने त्यांची मेसेंजर सेवा ९ मार्च १९९८ ला सुरु केली. त्यावेळी याहू शिवाय कोणीही चॅटिंगसाठीचा असा पर्याय सुरु केला नव्हता. त्यामुळे साहजिकच तरुणाईमध्ये याहू मेसेंजरची क्रेझ होती. पण जसजसे नवे पर्याय पुढे येऊ लागले तसा याहू मेसेंजरचा वापर कमी होऊ लागला. गुगलच्या जीमेलनंतर अनेक जण जी-टॉककडे वळले. आणि आता तर सगळेच व्हॉटसअप वापरतात. अगदी ऑफिसच्या कामासाठीही ते वापरले जात आहे. त्यामुळे याहूच्या मेसेंजरचा वापर कमी झाला आहे.

- Advertisement -
याहू मेसेंजरचा जुना आणि नवा लूक

मेसेज सेव्ह करुन ठेवा

आजपासून याहूचे मेसेंजर बंद होत असले तरी तुम्हाला पुढील ६ महिन्यापर्यंत मेसेजची हिस्ट्री डाऊनलोड करता येणार आहे. शिवाय आज जर तुम्ही याहू मेसेंजर वापरायचा प्रयत्न केला तर तुम्ही स्क्विरल अॅपला स्विच व्हाल.

याहूशी अनेकांच्या आठवणी

याहूच्या या मेसेंजरशी अनेकांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. अगदी १९९८ पासून ते २०१८ पर्यंत याचा वापर करणारे देखील अनेक आहेत. ही बातमी कळल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -
  • चॅट रुम

याहूच्या मेसेंजरमधील हे फीचर सगळ्यांना आवडणारे होते. कारण यात पब्लिक चॅटला वाव होता. शिवाय एकाचवेळी तुम्ही एकापेक्षा अनेक ग्रुपला कनेक्ट होऊन चॅट करु शकत होता. हाताळायला अगदी सोपा होता. पण २०१२ साली चॅट रुम हे फीचर बंद करण्यात आले.

  • व्हिडिओ कॉल

आयफोनमध्ये फेस टाईम यायच्या आधी याहू मेसेंजरने व्हिडिओ कॉल हे फीचर आणले. पण त्यावेळी असलेल्या वीजेए वेब कॅममध्येही व्हिडिओ कॉलचा आनंद घेतला जायचा. पण आताच्या हायस्पीड इंटरनेट आणि इतर पर्यायांमुळे तेही फीचर मागेच पडले.

  • इमोजीची ओळख

सगळ्यात आधी इमोजी आणि स्टिकर्सची ओळख याहू मेसेंजरने करुन दिली. त्यानंतर फेसबुकच्या मेसेंजरमध्ये स्माईली आल्या. पण याहूमधील इमोजीस खास होत्या आणि प्रसिद्ध देखील होता. आता हे सगळं याहू यूजर्स मिस करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -