घरटेक-वेकसीएफ मोटोच्या चार मोटरसायकल बाजारात

सीएफ मोटोच्या चार मोटरसायकल बाजारात

Subscribe

सीएफ मोटोच्या सहयोगाने एएमडब्ल्यू मोटरसायकल्सने भारतात सीएफ मोटोची 4 मॉडेल्स आणली आहेत. ही बाजारात दाखल झालेली सीएफ मोटोची मॉडेल्स आहेत- 300 एनके, 650 एनके, 650 एमटी अणि 650 जीटी.एएमडब्ल्यूचे सीईओ वाम्सी कृष्णा जगिनी याप्रसंगी म्हणाले, भारतीय बाजारपेठेत ही बाईक बहु प्रतिक्षीत होती. सीएफ मोटोची भागीदारी करून त्यांची जगप्रसिद्ध मॉडेल्स भारतात येताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही बाईक प्रीमियम विभागातील असून या श्रेणीमध्ये खूप चांगली मागणी आहे.

सीएफ मोटो 300 एनके ही स्ट्रीट फायटर आहे आणि त्यामध्ये ड्युअल रायडिंग मोड्स, टीएफटी कलर डिस्प्ले, एलईडी लायटिंग आणि मागील मडगार्ड आहे. त्यामध्ये संपूर्ण एलईडी हेड लॅम्प्स आणि एलईडी टर्न इंडिकेटर्स असून यामध्ये 299 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन बसवले आहे. सीएफ मोटो मोटरसायकल्स या 300-350 सीसी शक्तीच्या आहेत. सीएफ मोटोची चार उपलब्ध मॉडेल्स आहेत- 300 एनके, 650 एनके, 650 एमटी अणि 650 जीटी. या मॉडेल्सची भारतीय बाजारातील किंमत अनुक्रमे 2,29,000 रुपये, 3,99,000 रुपये, 4,99.000 रुपये आणि 5,49,000 रुपये (संपूर्ण भारतात एक्स-शोरुम किंमत) आहे. या मोटरसायकल्स सीकेडी मार्गाने भारतात आणल्या जातील आणि एएमडब्ल्यूच्या बंगळुरू येथील असेम्ब्ली प्लांटमध्ये तिची स्थानिक पातळीवर जोडणी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -