घरटेक-वेकखास भारतीयांसाठी 'Datamail' app, पाहा फिचर्स

खास भारतीयांसाठी ‘Datamail’ app, पाहा फिचर्स

Subscribe

एकाचवेळी १५ प्रादेशिक भाषांमधून सेवा देणारं DataMail हे भारतातलं पहिलं वहिलं अॅप असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

व्यावसायिक तसंच खासगी कामांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘Gmail’ला, टक्कर देण्यासाठी एक नवीन अॅप विकसीत करण्यात आलं आहे. DataMail असं या app चं नाव असून, डाटा एक्सजेन टेक्नोलॉजी या आयटी कंपनीने त्याची निर्मीती केली आहे. खास भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या या अॅपमध्ये मराठी, गुजराती, बंगाली अशा १५ प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. एकाचवेळी १५ प्रादेशिक भाषांमधून सेवा देणारं DataMail हे भारतातलं पहिलं वहिलं अॅप असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. Gmail, Yahoo, Rediff मेल सारख्या मेल वेबसाईटप्रमाणेच या अॅपची देखील स्वतंत्र्य वेबसाईट आहे. ज्याचा वापर तुम्ही खासगी तसंच व्यावसायिक कामांसाठी करु शकता.

खुषखबर : भारत बनवणार iPhone, किंमत होणार कमी

या अॅपचं वैशिष्ट्यं म्हणजे यावर तुम्हाला हवं त्या भाषेमध्ये डोमेन बनवता येतो. हे अॅप तयार करणारी डाटा एक्सजेन टेक्नोलॉजी ही भारतीय कंपनी आहे. DataMail हे अॅप डाऊनलोड केल्यावर किंवा त्याच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर तुम्ही तुमची मनपसंत भाषा निवडून हे अॅप सुरु करु शकता. याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे यावर तुम्हाला ‘रेडिओ’ फिचरचाही लाभ घेता येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -