ड्रूमची फोर्ड इंडियासह भागीदारी

Mumbai
ford

भारतातील सर्वात मोठे आणि अग्रगण्य ऑनलाईन ऑटोमोबाईल ट्रान्झॅक्शनल मार्केटप्लेस, ड्रूम यांनी प्रदान केलेले समावेशक किंमतीचे इंजिन ऑरेंज बुक व्हॅल्यूला नुकतेच फोर्ड इंडियाने सेकंडहँड कारच्या व्हर्टिकल ‘फोर्ड अश्युअर्ड’ साठी स्वीकारले आहे. या सामरिक सहकार्याद्वारे, ड्रूमचे ओबीव्ही सॉल्यूशन कंपनीला त्यांच्या किमतीची यंत्रणा आणि एपीआय एकत्रिकरण वापरण्यास सक्षम करेल. ओबीव्ही किंमत प्रमाणीकरण सेवांचा वापर करून सेकंडहँड फोर्ड कारची विक्री करण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णयासाठी उद्दिष्ट आणि निःपक्षपाती यंत्रणा प्रदान करणे सुलभ होईल. ओबीव्ही विविध विभाग आणि व्हर्टिकल्समध्ये प्रवेश करत आहे आणि फोर्ड इंडियाबरोबरची ही युती या विस्तारीकरणाचा एक भाग आहे.

ड्रूमचे बिझनेस डेव्हलपमेंट अध्यक्ष देवेश राय यांनी म्हटले आहे की, ओबीव्हीच्या सुविधाजनक सेवेमुळे, सेकंडहँड वाहनांची खरेदीविक्री प्रक्रिया केवळ विनात्रास आणि सुलभच बनली नाही, तर शोधण्याचा वेळ आणि किंमत देखील लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. फोर्ड इंडियाच्या सेकंडहँड कार व्हर्टिकलसाठी ही युती यात गुंतलेल्या सर्व भागधारकांसाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरेल. या संबंधांच्या माध्यमातून आम्ही सेकंडहँड वाहन खरेदी करताना अधिकाधिक लोकांना माहितीपूर्ण निर्णयाद्वारे सक्षम बनवण्यास उत्सुक आहोत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here