खूष खबर! कारवर मिळतेय भरभक्कम सूट

Mumbai
Cars

कार खरेदी करू इच्छिणार्‍यांना खूष खबर आहे. कारचा जुना स्टॉक संपवण्यासाठी कारचे डिलर्स कारवर मोठी सूट देत आहेत. क्विड, होंडा सिटी, वॅगन आर अशा गाड्यांवर तब्बल दीड लाखांपर्यंतची सूट ग्राहकांना मिळत आहे.

डिलर्सने मारुती सुझुकीची वॅगन आर कारवर एक लाखांची दिली आहे. तसेच कॅश आणि एक्सचेंज बोनस यांचाही यात समावेश आहे. होंडा सिटीच्या सेडान गाड्या, सियाज, टोयोटा, यारिस आणि ह्युंदाई यासारख्या गाड्यांवरही भरभक्कम सूट आहे. २०१८ चा स्टॉक संपवण्यासाठी होंडा डिलरने सेडान कारवर १.४ लाखांची सूट देण्यास सुरुवात केली आहे. ह्युंदाई एलांत्रावर तब्बल दीड लाखांची सूट दिली जात आहे. एलांत्रा ही गाडी भारतात सर्वात जास्त चांगली दिसणार्‍या गाडीपैकी एक गाडी आहे.

या गाडीवर एक्सचेंज बोनस, रोख रक्कम आणि मोफत विमा यांचा समावेश आहे. रेनो इंडियाने हॅचबॅक कार क्विडला अधिक सुरक्षा आणि सुविधासह बाजारात उतरवले होते. या कारवर डिलर ८५ हजारांपर्यंत सूट देत आहेत. महिंद्रा केयुव्ही १०० एनएक्सटीवर १ लाखांची सूट दिली जात आहे. कंपनीने महिंद्रा केयुव्ही १०० वर ५० हजारांपर्यंत सूट आणि ३५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच ५ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here