घरटेक-वेकफेसबुक सुरु करणार स्वतःचे 'डेटिंग अ‍ॅप'

फेसबुक सुरु करणार स्वतःचे ‘डेटिंग अ‍ॅप’

Subscribe

'डेटिंग अॅप'ची चाचणी फेसबुकने केली असून लवकरच नवीन फीचर फेसबुकवर बघायला मिळणार आहे.

टिंडर, क्वॅक क्वॅक नंतर आता फेसबुकही डेटिंग अॅप सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक लवकरच स्वतःचे डेटिंग अॅप सुरु करणार असून याची चाचणी सुरु करण्यात आली आहे. फेसबुच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अॅपची प्रायोजिक तत्वावर चाचणी सुरु केली आहे. या बद्दल ट्विटरवर माहिती टाकण्यात आली आहे. या अॅपबद्दल अजून फेसबुक कडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. सध्या डेटिंग अॅप लोकप्रिय होत असल्यामुळे फेसबुकनेही त्या दिशेने पाऊले उचलली आहे. फेसबुक वापरत असतानाही डेटिंग साईट्सवर लॉग ईन करणाऱ्यांना वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. चाचणीसाठी पुरेसा डेटा उपलब्ध नसल्यामुळे फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना यासाठी फेक डेटावापरण्यास सांगितला आहे.

काय आहे डेटिंग अॅप

‘डेटिंग अॅप’मुळे आपण दुसऱ्या युजर्सना डेट करु शकतो. प्रेमाच्या शोधात असलेलेही डेटिंग अॅप्सचा वापर करतात. फेसबुकवर सुरु होणाऱ्या डेटिंग अॅपवर फेसबुक युजर्सचा फोटो आणि युजर्सशी निगडीत माहिती उपलब्ध असणार आहे. फेसबुक डेटिंगचा पर्याय लोकांना अॅक्टिव्हेट कराव लागेल. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फ्रेन्डनापण डेटिंग रिक्वेस्ट पाठवू शकता. समोरच्या युजर्सने जर तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर तुम्ही त्याच्याशी चार्टिंग करु शकता. हे अॅप मोबाईल वरही उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

फेसबुक नेहेमीच युजर्ससाठी काही नवीन फीचर घेऊन येत असते. इतर कंपन्यांनी काढलेले डेटिंग अॅप लोकप्रिय झाल्यामुळे फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. जगभरातून या अॅप्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेसबुक वापरत असतानाही युजर्स डेटिंग अॅपचा वापर करतात. डेटिंग अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी अनेकदा फेसबुकचेच लॉग ईन आयडी आणि पार्सवर्ड वापरला जातो. त्यामुळे फेसबुक वरील डेटा इतर कंपन्यांना शेअर होतो. यासाठीच पर्याय म्हणून हे अॅप फेसबुकच्या नवीन फीचर्सच्या स्वरुपात लॉन्च केल जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -