फेसबुकचं भारतीय युजर्ससाठी भन्नाट फिचर लाँच

या फेसबुकच्या नव्या फिचर अॅपबद्दल जाणून घ्या.

New Delhi
facebook launched avatars feature in india how to make your face
फेसबुकचं भारतीय युजर्ससाठी भन्नाट फिचर लाँच

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने भारतात एक नवं फिचर लाँच केलं आहे. Avatars असं या फिचरचं नाव आहे. यामध्ये फेसबुक युजर्स स्वत:सारखा दिसणार वर्च्युअल अवतार तयार करू शकतो. फेसुबकने हे फीचर अशावेळी लाँच केलं आहे जेव्हा भारत सरकारने टिकटॉकसहित ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

फेसबुकने तयार केलेलं Avatars हे फिचर तुम्ही स्टिकर किंवा चॅटमध्ये वापर करू शकता. कंपनीने म्हटले आहे की, भारतात हे लाँच केलं आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सोशल इंटरअॅक्शन वाढत आहे.

फेसबुकसाठी भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यामुळे कंपनीने संधीचा फायदा घेऊन हे फिचर लाँच केलं आहे. फेसबुकच्या Avatars या फिचरमध्ये वेगवेगळे चेहरे, हेअरस्टाईल आणि आऊटफिट्सचे अनेक ऑप्शन दिले आहेत. भारतात युजर्ससाठी हे कस्टमाईज केलं आहे.

फेसबुक स्टोरीसारखं हे फिचर स्नॅपचॅट सारखं आहे. स्नॅपचॅटवर Bitmoji नावाचं फिचर आहे. याचा वापर करून स्नॅपचॅट युजर्स Avatars तयार करू शकतात.

फेसबुकच्या या Avatars फिचरवर आपाआपले चेहर तयार करून ते इतर ठिकाणी देखील युज करू शकता. व्हॉट्सअॅपवर देखील स्टिकर सारख या अवतारचा वापर करू शकता.

असं तयार करू शकता फेसबुक Avatars?

आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक किंवा मेंसेजर ऑपन कराव लागेल. त्यानंतर कॉमेन्ट ऑप्शनवर जाऊ स्माईली बटन टॅप करावं लागेल. मग यानंतर स्टिकर्सचा टॅब सिलेक्ट करायचा आहे.

मग Create Your Avatar असं ऑप्शन येईल. याचा वापर करून तुम्ही तुमचा वर्च्युअल अवतार तयार करू शकाल. यामध्ये खूप वेगवेगळे कस्टमाइजेशन ऑप्शन दिले गेले आहेत.

स्किन कलर, हेअर स्टाईल आणि कपड्यांपासून चेहऱ्यापर्यंत वेगवेगळे कस्टमाइजेशन ऑप्शन मिळतील. Avatar तयार झाल्यानंतर आपल्या जवळ सेव्हचं ऑप्शन असणार आहे. तुम्ही हा अवतार फेसबुकवर देखील शेअर करू शकता.

सध्या हे फिचर फेसबुकने अँड्रॉइड युजर्ससाठी जारी केलं आहे. पण येणार दिवसांमध्ये iPhone युजर्ससाठी देखील जारी करण्यात येणार आहे.