फेसबुकवरही सेंट मेसेज Delete करता येणार

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, एकदा सेंट झालेला मेसेज डिलीट करण्यासाठी युजरकडे १० मिनीटांचा वेळ असेल

Mumbai
Facebook Messenger ‘Unsend’ feature coming soon
प्रातिनिधिक फोटो

व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता फेसबुकवरही ‘सेंट’ झालेला मेसेज Delete करता येणार आहे. एखाद्याला पाठवलेला मेसेज त्याने वाचण्यापूर्वीच डिलीट करण्याचं फिचर व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी लाँच केलं होतं. आता फेसबुकवरही लवकरच हा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फेसबुक मेसेंजवरही आता युजर एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. लवकरच मेसेंजरवर हे नवं फिचर लाँच होईल, अशी माहिती फेसबुकने अधिकृतपणे जाहीर केली आहे. मेसेज डिलीटचं हे फिचर सर्वात आधी iOS च्या १९१.० /e व्हर्जनमध्ये येणार आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, एकदा सेंट झालेला मेसेज डिलीट करण्यासाठी युजरकडे १० मिनीटांचा वेळ असेल. याचाच अर्थ मेसेज पाठवल्यानंतर तो १० मिनीटांमध्येच डिलीट करता येईल. या फिचरमुळे फेसबुक मेसेंजरवरुन तुम्ही एखाद्याला चुकून मेसेज पाठवल्यास त्वरित डिलीट करु शकता.


वाचा: फोनमधील हे ‘सिक्रेट कोड्स’; तुम्हाला माहितीयेत का?

फेसबुक युजर्सकडून गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरची मागणी केली जात होती. दरम्यान, हे फिचर लाँच करण्याबाबत एप्रिल महिन्यापासून फेसबुकचा विचार सुरु होता. अखेर ऑक्टोबरमध्ये या फिचरची चाचणी सुरु करण्यात आली आणि आता येत्या काही काळातच त्याचं लाँचिंग करण्यात येणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच फेसबुकची तब्बल ८१ हजार अकाउंट्स हॅक झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामुळे फेसबुकवरील युजर्सचा डेटा असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा जागसमोर आलं. यामुळे जगभारातील लोकांकडून फेसबुकवर टीकेची झोड उठवली होती. फेसबुकवरुन अशाप्रकरे युजर्सची माहिती लिक होण्याचे प्रकार याआधीही अनेकदा घडले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here