फेसबुकने घातला पुन्हा घोळ; १५ लाख लोकांचा ई-मेल आयडी सार्वजनिक

काही महिन्यांपूर्वी फेसबुने वापरकर्त्यांची वैयक्तीक माहिती सार्वजनिक केल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे मोठी गदारोळ झाला होता. आता पुन्हाच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाल्याचे बघायला मिळत आहे. फेसबुकने १५ लाख वापरकर्त्यांचे ईमेल आयडी सर्व्हरवर अपलोड केले आहेत. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

Mumbai
facebook upload 1.5 millions users mail id on server
फेसबुकने घातला पुन्हा घोळ; १५ लाख लोकांचा ई-मेल सार्वजनिक

फेसबुकने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. १५ लाख वापरकर्त्यांचे ई-मेल आयडी फेसबुकने परवानगी शिवाय सार्वजनिक केले आहेत. त्यामुळे फेसबुकवरील वापरकर्त्यांची माहिती कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती फेसबुकवर लॉग इन किंवा साईन इन करते तेव्हा फेसबुक त्या व्यक्तीला ईमेल आयडी विचारतो. परंतु, हेच ईमेल आयडी आता सार्वजनिक झाल्याची माहिती एका अहावालात समोर आली आहे. शिवाय, फेसबुकने याबाबतीत आपली चुक मान्यही केली आहे.

फेसबुकने परवानगी शिवाय सर्व्हरवर टाकला ईमेल आयडी

बिजनेस इनसाइडरने दिलेल्या अहवालानुसार फेसबुकने २०१६ पासून आतापर्यंत १५ लाख वापरकर्त्यांचे ईमेल आयडी सर्व्हरवर आपलोड केले आहेत. ई-सुशी नावाच्या एका ट्विटर युजरने एक ट्विटरवर ब्लॉग प्रकाशित केला होता. या ब्लॉगमध्येही त्याने म्हटले होते की फेसबुक काही वापरकर्त्यांना साइन करतेवेळी ईमेलचा पासवर्ड विचारतो. डेली बीस्ट आणि बिझनेस इन्सायडरने केलेल्या तपासणीत असे उघड झाले की, ‘फेसबुकवर पासवर्ड टाकल्यानंतर एका पॉप-अप मार्फत वापरकर्त्यांना सुचित केले जाते की एखादी सोशल मीडिया कंपनी त्यांच्या ईमेल आयडी मार्फत माहिती आयात करीत आहेत. हे सर्व वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय घडत असतं.’

फेसबुकने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या (ईएफएफ) सुरक्षा संशोधक बेनेट सायफरने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सोशल मीडिया कंपनीने नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून खात्याचे पासवर्ड गोळा केले आहेत. यावर आता फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे. ‘फेसबुकने कोणत्याही वापरकर्त्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. सर्व्हरवर टाकण्यात आलेली ईमेलची माहिती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.’ याशिवाय फेसबुकने असेही म्हटलं आहे की, ‘ज्या लोकांचे ईमेल आयडी सर्व्हरवर अपलोड करण्यात आले आहेत त्यांना सुचित करण्यात आले आहे.’ अमेरिकेच्या एका वृत्त वाहिनीशी बोलताना फेसबुकच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ‘गेल्या महिन्यापासून आम्ही फेसबुकवर वापरकर्त्याला ईमेल आयडी न विचारण्याचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत १५ लाख लोकांची ईमेल आयडी सर्व्हरवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, कुणाचीही वैयक्तीक माहिती सार्वजनिक होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. याशिवाय आता ते सर्व्हरवरचे सर्व ईमेल आयडी आम्ही नष्ट करत आहोत. सध्या या मुलभूत समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांची ईमेल आयडी आयात करण्यात आले आहेत त्यांना त्याविषयी माहिती दिली गेली आहे. वापरकर्ते आपल्या फेसबुक अकाउंटच्या सेटींग्जमध्ये जावून बघू शकतात.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here