घरटेक-वेकआता Facebook वरुन मैत्री करा 'समविचारी' लोकांशी!

आता Facebook वरुन मैत्री करा ‘समविचारी’ लोकांशी!

Subscribe

दोन लोकांमध्ये मैत्री करुन देणारं हे 'थिंग इन कॉमन' फिचर, जगभरातील युजर्सना नक्कीच आवडेल असा विश्वास फेसबुककडून व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडिया माध्यमांच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फेसबुक नेहमीच काही ना काही नवीन बदल करत असतं. आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या फीचर्सचा समावेश फेसबुककडून केला जातो. अशाचप्रकारचं एक नवीन फिचर फेसबुककडून लवकरच लाँच करण्यात येणार आहे. ‘थिंग इन कॉमन’ असं या अॅपचं नाव असून, जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हे खास फीचर फेसबुकने डेव्हलप केल्याचं समजत आहे. जगभरातील समविचारी लोकांना एकमेकांशी जोडण्याचं, त्यांची ऑनलाईन भेट घडवून देण्याचं काम ‘थिंग इन कॉमन’ हे फिचर करणार आहे. या फिचरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या विचारांशी, स्वभावाशी मिळत्या जुळत्या लोकांशी संपर्क शाधू शकणार आहात. त्यांच्याशी मैत्री करु शकणार आहात. यामुळे भाषा, प्रांत, देश या सर्व सीमारेषांच्या पलीकडे जाऊन तुम्ही जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीशी सहज जोडले जाऊ शकता. हे ‘थिंग इन कॉमन’ फिचर जगभरातील युजर्सना नक्कीच आवडेल असा विश्वास फेसबुककडून व्यक्त केला जात आहे.

…असं वर्क करणार हे फीचर

समजा तुम्ही फेसबुकवर केलेल्या एखाद्या पोस्टवर, एका अज्ञात व्यक्तीने कमेंट केली आहे किंवा तुम्हाला त्याचधर्तीवर मेसेज पाठवला आहे. मग अशावेळी जर तुम्ही टाकलेल्या पोस्टमधील विचार / माहिती आणि कमेंट वा मेसेज करणाऱ्या  अज्ञात व्यक्तीच्या मेसेज/कमेंटमधील विचार यामध्ये फेसबुकला साधर्म्य वाटल्यास, फेसबुक तुम्हाला त्या व्यक्तीशी मैत्री करण्याचा सल्ला देईल. ‘थिंग इन कॉमन’ या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला आणि त्या व्यक्तीलासुद्धा एकमेकांशी मैत्री करण्याचं सजेशन दिलं जाईल. याशिवाय एकाच पेजला फॉलो करणाऱ्या तसंच एकाच ग्रुपमध्ये असलेल्या व्यक्तींचे विचार जुळतायत असं वाटल्यास त्यांनाही फेसबुककडून फ्रेंडशीपचं सजेशन पाठवलं आहे. दरम्यान सध्या या ‘थिंग इन कॉमन’ फिचरचं परिक्षण सुरु असून, लवकरच ते युजर्सना वापरासाठी खुले होईल, अशी माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -