Fact Check: तुमच्या Whatsapp वरही येतात का घर बसल्या पैसे कमवायचे मेसेज; जाणून घ्या सत्य

महात्मा गांधी बेरोजगार योजनेच्या नावावर पैसे कमावण्याचा मेसेज अनेक दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे.

घरी बसून पैसे कमावण्याचा मेसेजही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आला असेल तर आधी तो किती सत्य आहे हे जाणून घ्या. केंद्र सरकार लोकांना महात्मा गांधी बेरोजगार योजनेंतर्गत पैसे कमविण्याची संधी देत ​​आहे का? जाणून घ्या, काय आहे नेमके सत्य…

सोशल मीडियावर दिशाभूल करणार्‍या पोस्ट आणि बातम्यांचा नेहमीच पूर येत असतो. या फसव्या बातम्यांना ओळखणे फार कठीण आहे. भ्रामक आणि बनावट व्हायरल पोस्ट्स किंवा बातम्या खऱ्या किंवा खोट्या आहेत हे खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याचबरोबर सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार महात्मा गांधी बेरोजगारी योजनेंतर्गत घरी बसून पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे.

दरम्यान, महात्मा गांधी बेरोजगार योजनेच्या नावावर पैसे कमावण्याचा मेसेज अनेक दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मेसेजच्या सत्यतेची चौकशी पीआयबीने केली आहे. पीआयबीने आपल्या तपासणीत ही व्हायरल पोस्ट फसवी असल्याचे सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाउंटवर या दाव्याचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.


आता पाकिस्तान बासमती तांदुळासाठी भारताशी भांडणार!