घरटेक-वेकफेसबुकवर १०० कोटी बनावट अकाऊंट?

फेसबुकवर १०० कोटी बनावट अकाऊंट?

Subscribe

फेसबुकवरील १०० कोटी अकाऊंट बनावट असल्याचा दावा, फेसबुककडून फेटाळण्यात आला आहे. फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग यांचा एकेकाळचा वर्गमित्र अ‍ॅरोन ग्रीनस्पॅन यांनी हा दावा केला आहे. मात्र तो फेटाळून लावण्यात आला आहे.

मार्क झुकेरबर्ग यांचा वर्गमित्र असलेल्या अ‍ॅरोन ग्रीनस्पॅन यांनी ७० पानी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ हा रिपोर्ट तयार केला आहे. अ‍ॅरोन आणि झुकेरबर्ग हे हॉवर्ड विद्यापीठामध्ये २००२ ते २००४ दरम्यान शिकत होते. अ‍ॅरॉन यांनी फेसबुक २००४ पासून त्यांच्या युजर्सच्या संख्येत फुगवटा आणत असल्याचा दावा केला आहे. फेसबुकची ५० टक्के खाती बनावट असून त्यांची संख्या एकूण १०० कोटी असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे.

- Advertisement -

फेसबुकची आपणच निर्मिती केली होती, असा त्यांनी धक्कादायक दावा रिपोर्टमध्ये केला आहे. मात्र तडजोड करून त्यावरील मालकी ही २००९ मध्ये सोडण्यात आल्याचे अ‍ॅरोन यांनी स्पष्ट केले. फेसबुक त्यांच्याकडील अकाऊंटविषयी लोकांना खोटी माहिती सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. फेसबुकने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

फेसबुकने त्यांच्या दुसर्‍या तिमाहीत काही वापरकर्ते दोन अकाऊंट काढत असल्याचे म्हटले होते. असे वापरकर्ते हे महिन्याभरातील एकूण वापरकर्त्यांच्या संख्येच्या ६ टक्के आहेत. फेसबुकच्या एकूण अकाऊंटपैकी ३ ते ४ टक्केे बनावट असल्याची माहिती फेसबुकने अमेरिकेच्या सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -