घरटेक-वेकस्मार्ट फोनच्या दुनियेत वनप्लस 'सिक्स'!

स्मार्ट फोनच्या दुनियेत वनप्लस ‘सिक्स’!

Subscribe
स्मार्ट फोनच्या दुनियेत स्वतःची एक वेगळी ओळख असलेल्या वनप्लसने ‘वनप्लस ६’ हा नवा फोन मार्कटमध्ये लाँच केला आहे. वनप्लसचा हा आठवा फोन आहे. सिक्स लाँच होण्याआधीच त्याची एक वेगळीच उत्सुकता गॅझेटप्रेमींमध्ये होती. सिक्सचे ऑफिशिअल लाँच १६ मे, रोजी लंडन येथे झाले. आज (१७ मे) दुपारी तीन वाजता मुंबईतील एनएससीआयमध्ये ह्या फोनचे लाँन्चिग झाले. मिरर ब्लॅक, मिडनाइट ब्लॅक आणि सिल्क व्हाईट या तीन रंगांमध्ये सिक्स उपलब्ध आहे. या सोबतच वनप्लस ५ टी प्रमाणे द अवेंजर्सची लिमिटेड एडिशन देखील उपलब्ध असणार आहे.
पहिल्यांदा बघितल्यावर वन प्लस सिक्स हा वनप्लस ५ टी सारखा दिसतो. पण त्यात अनेक वेगळे फिचर्स आहेत. वनप्लसच्या इतर फोन प्रमाणेच हा फोन आहे. त्याचप्रमाणे या फोनला फिंगरप्रिंट सेन्सर, रियर ग्लास देण्यात आले आहे. तसेच हा वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो. त्याचबरोबर तीन वेगवेगळ्या रंगातून एक निवडण्याचा पर्याय देखील आहे. मिडनाइट ब्लॅक हा जास्त लोकप्रिय ठरेल अशी शक्यता आहे. यात मॅट टेक्स्चर सुद्धा असणार आहे. त्याला पाहताच क्षणी नक्कीच हात लावायचा मोह आवरणार नाही.
अपेक्षेप्रमाणे सिक्सचे ओएस अँड्रॉईड ८.१ ओरीयोवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ओरीयो गुडीज् वापरु शकता. काही नवीन वैशिष्ट्यांसह ऑक्सीजन ओएस ऑनबोर्डवर आहे. या छोट्या बदलांशिवाय युजर इंटरफेसवर दुसरे कोणतेही मोठे बदल नाहीत. ब्लॅक मिरर प्रकाराचा पॉलिश्ड असा रंग बघायला नक्कीच चांगला वाटतो आहे. हा फोन कव्हरशिवाय देखील वापरू शकता. तो तुम्हाला बऱ्यापैकी आयफोन ७ सारखा दिसेल.
तिसरा प्रकार सिल्क व्हाइट आहे. त्यामध्ये रोझ गोल्ड फ्रेम आहे, जो फोनला एक हटके लुक देतो.
स्क्रीन स्वाईप करण्यासाठी आणि लवकर होम स्क्रीन वर प्रवेश करण्यासाठी काही नवे पर्याय देण्यात आले आहेत. आपण त्याला सेटिंग्ज अॅपवरून चालु करू शकतो. ऑन-स्क्रीन नेव्हिगेशन बटण देखील आहे. त्याचप्रमाणे गेमिंग मोड अधिक ऍडव्हान्स झाला आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी स्पीड सपोर्ट सुद्धा आधिक आहे. या फोनच्या स्पीड बद्दल बोलताना वनप्लसने दावा केला आहे की, त्याने अॅप्स उघडण्याच्या अॅनीमेशनसाठी त्याच्या युजर इंटरफेसवर काम केले आहे. वापरकर्त्यांना याचा खास फरक पडणार नाही, कारण ही केवळ काही मायक्रोसेकंद्सची बाब आहे.
वनप्लस ५ टी प्रमाणेच वनप्लस ६ मध्ये देखील १६ मेगा पिक्सल आणि २० मेगा पिक्सल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल आहे. ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती १२ तास चालेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिल्यावर हा फोन चांगला परफॉर्म करू शकतो, असे सह-संस्थापक कार्ल पेई यांचे म्हणणे आहे. लाँचच्या वेळी कंपनीचे सह-संस्थापक कार्ल पेई यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘फ्लॅगशिप किलर’ मध्ये  स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे, परंतु ९६० एफपीएस ऐवजी ४८० एफपीएस आहे. इतर फोनमध्ये ३० एफपीएसमध्ये ४ के व्हिडीओ शूट करण्याची क्षमता असताना या फोनमध्ये ४ के व्हिडीओ ६० एफपीएसमध्ये शूट करण्याची क्षमता देखील आहे. ह्या फोनची सध्या भारतातील किंमत ३५,९९९ आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -