घरटेक-वेकगुड न्यूज! Flipkartची डिलिव्हरी आता ९० मिनिटांत होणार!

गुड न्यूज! Flipkartची डिलिव्हरी आता ९० मिनिटांत होणार!

Subscribe

फ्लिपकार्टने हायपरलोकल डिलिव्हरी सव्हिस 'फ्लिपकार्ट क्विक' लाँच केली आहे. यामुळा आता ९० मिनिटांत डिलिव्हरी होणार आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart)ने आपली हायपरलोकल डिलीव्हरी सेवा ‘फ्लिपकार्ट क्विक’ (Flipkart Quick) लाँच करण्याची घोषणा केली आहे. या सेवेमध्ये ग्राहकांना ९० मिनिटांत किराणा, ताज्या भाजीपाला, मांस आणि मोबाइल फोन सारखी उत्पादने डिलिव्हरी होतील. ही सेवा सुरुवातीच्या काळात बेंगळुरूमधील काही निवडक ठिकाणी उपलब्ध आहे. याबाबतची माहिती फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष संदीप कर्वा यांनी माहिती दिली आहे.

फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष म्हणाले की, ‘काही जणांची आपल्याला शेजारच्या स्टोअरमधून सामान खरेदी करण्यासाठी इच्छा असते ते सर्वकाही लाईव्ह खरेदी करू शकला. याबरोबरच आम्ही फळे, भाज्या आणि मांस विकण्याची कॅटेगरी लाँच करण्याची घोषणा केली आहे.’

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या संकटात ऑनलाईन किराणी डिलिव्हरी करून बरेच पैसे कमावले आहेत. यामध्ये जिओमार्ट सारखी वेबसाईट खूप लोकप्रिय आहे. तशीच ती सध्या मोठी प्रतिस्पर्धी देखील आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑफलाईन विक्रेते वस्तूंची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत एकत्र येत आहेत.

गेल्या काही महिन्यांत फ्लिपकार्टने अनेक विविध शहरांमध्ये आवश्यक सामान आणि किराणा हायपरलोकल डिलिव्हरीसाठी स्पेंसर्स आणि विशाल मेगा मार्ट सारख्या विक्रेत्यासह भागीदारी केली आहे. गोल्डलमॅम दिलेल्या अहवालानुसार, २०२४ पर्यंत भारताच्या ई-कॉमर्स व्यवसायात एकत्रित वार्षिक वाढीचा दर २७ टक्के होईल. तसेच ९९ अब्ज डॉलर्सपर्यंत व्यवसाय पोहोचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Google च्या कर्मचार्‍यांचे जून २०२१ पर्यंत Work From Home!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -