घरटेक-वेकअॅपलच्या वस्तूंवर फ्लिपकार्ट देतंय घसघशीत सूट!

अॅपलच्या वस्तूंवर फ्लिपकार्ट देतंय घसघशीत सूट!

Subscribe

अवघ्या १८९९ रुपयांमध्ये मिळवा अॅपल प्रॉडक्ट्स

फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर २१ मे ते २९ मे दरम्यान अॅपल प्रॉडक्ट्सवर घसघशीत सूट मिळणार आहे. अॅपलच्या सर्वच मोठ्या प्रॉडक्टसवर ही सूट मिळणार आहे. आयफोन, आयपॉड, आयपॅड तसेच अॅपल वॉच आणि मॅकबूकवर चांगली सूट मिळणार आहे. याबरोबरच आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डवर अधिक १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. नुकतेच वॉलमार्ट या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन शॉपिंग पोर्टलने फ्लिपकार्टला टेकओव्हर केले असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर आता आयफोनसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडवर फ्लिपकार्ट ही घसघशीत सूट देत आहे.
या सेलमध्ये अॅपलचे इयरपॉड्सवर २४ टक्के सूट असणार आहे. ज्यानंतर ते अवघ्या १८९९ रुपयांना मिळणार आहेत. तसेच अॅपल एयरपॉडसवर १० टक्के सूट असून, ते आपणास ११,४९९ रुपयांना मिळणार आहेत.
यासोबतच अॅपलचे खास आकर्षण असलेल्या आयफोनवर देखील चांगली सूट मिळत आहे. लेटेस्ट आयफोन एक्स मधील ६४ जीबी इंटरनल मेमरी असणारे मॉडेल ८५,९९९ ला मिळणार आहे. तसेच ६७,९४० रूपयांचा आयफोन ८ अवघ्या ६२,९९९ ला मिळत आहे. आयफोनच्या इतर मोबाइलवर पाच टक्के सूट मिळणार आहे. आयफोन ७ च्या ३२ जीबी मॉडेलवर २००१ रुपयांची सूट असून तो ४६,९९९ ला मिळणार आहे. अॅपल आयपॅडवर १८ टक्के सूट असून यानंतर २२,९०० रुपयांना मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -