घरटेक-वेकफ्लिपकार्टला हवीय एफडीआयच्या नियमांचे पालन करण्यासाठी मुदत

फ्लिपकार्टला हवीय एफडीआयच्या नियमांचे पालन करण्यासाठी मुदत

Subscribe

वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने केंद्र सरकारला एफडीआयच्या नियमांचे पालन करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. हा अवधी दिला नाहीतर ग्राहकांची संख्या घटण्याची भीती आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

एफडीआयचे नवे नियम १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या उद्योग विभागाला फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्तीने एक पत्र लिहिले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे, की व्यवसायला आणखीन चांगल्या रितीने चालवण्यासाठी एफडीआयच्या नियमांचे विश्लेषण करण्याची गरज आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणतात, की नियम व्यवस्थितरित्या पाळण्यात यावे यासाठी कंपनीला आपल्या प्रणालीमध्ये अनेक बदल करण्याची गरज आहे. कल्याण कृष्णमूर्ती यांनी हे नियम पुढील ६ महिन्यांनंतर लागू करण्याचे निवेदन दिले आहे. जर असे झाले नाही तर कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते.

एफडीआयचे नवे नियम १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. हे लागू झाल्यानंतर कोणतीही ई-कॉमर्स कंपनी अशा कोणत्याही कंपनीचे सामान आपल्या प्लॅटफॉर्मवर विकू शकत नाही ज्यामध्ये ई-कॉमर्स कंपनीची भागीदारी राहणार. इतकेच नाही तर हा नियम लागू झाल्यानंतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक्सक्ल्युझिव्ह विक्री, ऑफर्स किंवा डील्स देण्यात येणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -