घरटेक-वेकWhatsapp चॅटिंग सुरक्षित राहण्यासाठी जाणून घ्या चार दमदार सेटिंग्स

Whatsapp चॅटिंग सुरक्षित राहण्यासाठी जाणून घ्या चार दमदार सेटिंग्स

Subscribe

जगातील सर्वात मोठ्या मेसेजिंग Whatspp appचे सध्या वेगवेगळे फिचर्स आले आहेत. कोरोनाचा काळात Whatsappचे महत्त्व वाढले आहे. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे Whatsapp चा जास्त वापर केला जात आहे. त्यामुळे आपली Whatsapp चॅटिंग सुरक्षित असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे आज तुम्हाला Whatsapp च्या चार दमदार सेटिंग्स सांगणार आहे. असे केल्याने तुमची Whatsapp चॅटिंग कुणीच वाचू शकणार नाही.

या सेटिंग्समुळे Whatsappवर सिक्योरिटीची एक्स्ट्रा लेअर लावते. यासाठी तुम्हाला Whatsapp पिन सेट करावा लागले. त्यानंतर हे पिन Whatsapp तुम्हाला कधीही विचारू शकते.

- Advertisement -

Two-Step verification करा 

Whatsapp

पहिल्यांदा Whatsappच्या सेटिंगमध्ये जाऊन Two-Step verificationवर क्लिक करायचे. त्यानंतर तिथे Enable वर क्लिक करून पिन सेट करायचा. यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा हातात तुमचा मोबाईल गेला तर तो तुमची Whatsapp चॅटिंग वाचू शकणार नाही.

- Advertisement -

Read Receipts बंद करणे

या Whatsappच्या फिचरसचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. प्रायव्हसीमध्ये गेल्यावर Read Receipts टर्न ऑफ कराव लागेल.

Fingerprint Lock चा असा करा वापर

Fingerprint Lockचा वापर करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनमध्ये जावे लागेल. इथे गेल्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन Fingerprint Lockचा दिसेल. तो इनेबल करायचा. यामुळे तुमचे Whatsapp कोणीही ओपन करू शकत नाही.

Chat Backup बंद करा

Chat Backup घेण्याचा जितका फायदा असतो तितका तोटा देखील असतो. Chat Backup च्या माध्यमातून तुमचे डिलिट झालेले चॅट परत मिळवता येतात. पण गुगल आणि Apple अकाऊंटसवर ते सेव्ह होतात. त्यामुळे अनेकवेळा ते हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे Chat Backup ऑटो बंद करा. यासाठी तुम्हाला Whatsapp सेटिंगमध्ये जाऊन चॅट्स ऑप्शन क्लिक करावे लागेल. या ठिकाणी असलेल्या Chat Backup वर क्लिक करून Backup to Google Drive मध्ये जाऊन Never वर क्लिक करावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -