खुशखबर! Redmi Note 6 Pro ची किंमत घसरली

Mumbai

चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या Redmi Note या सिरीजमधील, ‘Redmi Note 6 Pro’ हा फोन लाँच केला होता. १५ हजार रुपये किंमतीच्या आतील किंमतीचा हा फोन सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचं रिपोर्टमधून समोर आलं होतं. Redmi Note 5 Pro या मॉडेलशी साधर्म्य साधणाऱ्या या नवीन फोनला भारतीय बाजारात आपली छाप पाडली. लाँचिंगच्यावेळी हा फोन दोन व्हेरियन्टमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यापैकी 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १० हजार ९९९ रुपये इतकी होती. तर, 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १२ हजार ९९९ रुपये इतकी होती. मात्र, आता Xiaomi कंपनीने या फोनच्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने याविषयी ट्वीट करत जुन्या मॉडेलच्या किंमतीत १,००० रुपयांची घट केल्याचं जाहीर केलं आहे.


कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेजचं मॉडेल आता १० हजार ९९९ ऐवजी ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर, रु 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेजचं मॉडेल आता १२ हजार ९९९ रुपयांऐवजी ११,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. Redmi Note 6 Pro ची ही दोन्ही नवी मॉडेल्स त्यांच्या नव्या किंमतींसह कंपनीच्या Mi.com या वेबसाईटवर तसंच Amazon या ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय Mi Home आणि सर्व रिटेलर दुकानांमध्ये देखील Redmi Note 6 Pro विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Redmi Note 6 Pro चा कॅमेरा Xiaomi चा आजवरचा सर्वात बेस्ट कॅमेरा आहे. आणि एवढ्या कमी पैशात इतका छान कॅमेरा आहे. यामुळे आता बाकी फोन कंपन्यांमध्ये खरंच स्पर्धा आहे. Redmi Note 6 Pro मध्ये 12MP + 5MP ड्युअल कॅमेरा आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here