घरटेक-वेकमोबाईलवर गेम खेळणाऱ्यांसाठी खुशखबर !

मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांसाठी खुशखबर !

Subscribe

रेझर ही कंपनी गेमिंगमधील सर्वोत्कृष्ट उत्पादनांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या कंपनीचा खास गेमिंग फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. त्यामुळे मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल.

मोबाईल फोन्सची क्रेझ तरुणांमध्ये काही कमी होताना दिसत नाहीये. मोबाईल कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले फोन्स सर्वसामान्यांच्या बजेट्समध्ये उपलब्ध करुन देत असल्यामुळे, दिवसागणीक त्यांची मागणी वाढतेच आहे. याच पार्श्वभूमीवर रेझर या कंपनीने एक नवा फोन बनवला आहे. हा फोन खास गेमर्ससाठी बनवण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे सध्या हा अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेला हा रेझर फोन लवकरच भारतामध्ये लाँच होणार आहे.  ‘रेझर’चे सीईओ मिंग लियान तान यांनी ट्वीटरच्या माध्यमातून नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतातील ‘गेम’ लव्हर्सना या भन्नाट फोनचा लाभ घेता येणार आहे. रेझर ही कंपनी गेमिंगमधील सर्वोत्कृष्ट उत्पादनांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे कंपनीने बनवलेल्या या नव्या फोनकडून गॅजेट प्रेमींच्या नक्कीच जास्त अपेक्षा असणार.

razer phone for game lovers
रेझर गेमिंग फोन (फोटो सौजन्य-razer.com)

रेझर फोनचे फीचर्स :

  • खास गेम लव्हर्ससाठी बनवण्यात आलेल्या या ‘रेझर’ फोनचे फीचर्सही तितकेच दमदार आहेत
  • या फोनमध्ये गेमर्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सामाविष्ट करण्यात आल्या आहेत
  • या फोनमध्ये ५.७ इंचाचा क्वॉड एचडी डिसप्ले देण्यात आला असून, हा २ हजार ६५० बाय १ हजार ४४० पिक्सल्स क्षमतेचा अल्ट्रामोशन डिस्प्ले आहे
  • फोनच्या स्क्रीनवर सुरक्षेच्या दृष्टीने गोरीला ग्लास (३) बसवण्यात आला आहे
  • यामध्ये गेमिंगसाठी खास क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ८३५ हा खूप वेगवान प्रोसेसर बसवण्यात आला आहे
  • या फोनचा रॅम ८ जीबी तर इंटरनल स्टोरेज ६४ जीबी आहे. विशेष म्हणजे २ tb पर्यंत तुम्ही हे स्टोरेज वाढवू शकता
  • फोनला १२ मेगापिक्सलचे २ बॅक कॅमेरे बसवण्यात आले असून ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे
  • ४ हजार mp क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये बसवण्यात आली आहे
  • या फोनला अॅल्युमिनिअम बॉडी बसवण्यात आली असून, गेमर्ससाठी खास डॉल्बी अॅटमॉस टेक्नॉलॉजीचे ड्युअल अॅम्पलिफायर स्पीकर्स देण्यात आले आहेत. हे स्पीक्रस मोबाईलच्या पुढच्या बाजूला आहेत
  • भारतामध्ये ५५ ते ६० हजार रुपयांच्या रेंजमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -