घरटेक-वेकजीमेलचं 'कॉन्फिडेन्शल मेल' नवं फीचर, ईमेलला नवं सुरक्षा कवच!

जीमेलचं ‘कॉन्फिडेन्शल मेल’ नवं फीचर, ईमेलला नवं सुरक्षा कवच!

Subscribe

मोठमोठ्या ऑफिसेसपासून ते अगदी लघुउद्योगांपर्यंत ऑफिशिअल कामांसाठी गुगलच्या जी-मेलाचा वापर सर्वाधिक होतो. जर तुम्ही जी-मेल वापरत असाल, तर जी-मेल युजर्ससाठी एक नवं फिचर गुगलने आणलं आहे. या फिचरमधून तुम्हाला तुमचे काही खास मेल ‘कॉन्फिडेंशल मेल’ (Confidential mail) म्हणून सेव्ह करता येणार आहेत.

युजर्सच्या वापरानुसार, गुगलने जी-मेलमध्ये आतापर्यंत अनेक बदल केले. अगदी जी-मेलच्या डिझाईन्सपासून ते हाताळण्यास कोणालाही सोपे वाटावेत, असे बदल आतापर्यंत करण्यात आले आहेत. आता ‘कॉन्फिडेंशल मेल’ नावाचा नवा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही पाठवलेल्या एखाद्या माहितीची गोपनीयता अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे. कारण या पर्यायात अशा मेल्सना ‘एक्सपायरी डेट'(Expiry date) असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे हा ई मेल ठरवलेल्या कालावधीतच समोरच्या युजरला दिसू शकणार आहे. शिवाय काही गोपनीय माहिती असल्यास ती माहिती फॉरवर्ड, कॉपी आणि प्रिंटदेखील करता येणार नाही. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांची अंतर्गत माहिती गोपनीय राहायला मदत होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, या ऑप्शनला अधिक सुरक्षित करण्याचं काम गुगलकडून सुरु आहे. एखादया मेलिशिअस प्रोग्रामकडून तुमचे कॉन्फिडेंशल मेल तुमच्या अटॅचमेंटसकट कॉपी होण्याची शक्यता असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

नवं फिचर कसं वापराल?

  • जी-मेलचं नवं फिचर वापरायचं असेल तर तुम्हाला नवं जी-मेल व्हर्जन घेणं गरजेचे आहे. त्यासाठी जी-मेलच्या सेटींगमध्ये जाऊन ‘ट्राय न्यू जीमेल’ (Try new gmail) हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर तुमचं जीमेलचं नवं कोरं व्हर्जन सुरु होईल.
  • कंपोझ मेल (Compose mail) हा पर्याय निवडल्यानंतर कंपोझ बॉक्सच्या तळाशी एक लॉक आयकॉन (Lock icon) आणि क्लॉक (Clock) साईन दिसेल. ज्यावर क्लिक केल्यानंतर एक पॉप अप मेन्यू येईल ज्यात तुम्हाला त्या मेलची एक्सपायरी १ दिवसापासून ते ५ वर्षांपर्यंत सेट करता येईल.
  • गोपनीयतेचा विचार करता यात आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे पासकोडचा (Passcode). अर्थात तुम्ही तुमच्या मेलसाठी पासवर्ड सेट करु शकता. जो पासवर्ड ईमेल किंवा एसएमएस बेस असू शकतो.
  • तुम्ही एखाद्याला मेल पाठवला असेल आणि तुम्हाला त्या मेलच्या अॅक्सिसमधून त्याला काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या एक्सपायरी पिरेडच्या (Expiry period)आत तुम्ही तो मेल काढून टाकू शकता, त्यासाठी सेंट (Sent) ऑप्शनवर क्लिक करा. कॉन्फिडेंशल मेल ओपन करुन रिमूव्ह अॅक्सिसचा पर्याय निवडा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -