व्यावसायिक तसंच खासगी पातळीवर ‘जीमेल’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. Gmail चा नियमीत वापर करणारे जगभरात करोडो युजर्स आहेत. या सर्व युजर्सच्या हिताचा विचार करुन जीमेल कंपनीने ३ नवीन फिचर्स सामाविष्ट केली आहेत. ही तिन्ही नवीन फिचर्स गुगलच्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सवर आधारित आहेत.
यामध्ये ‘Smart Compose’ हे सर्वात जास्त लोकप्रिय फिचर ठरलं आहे. या फिचरला Google च्या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आले आहे. Smart Compose फिचरचा उपयोग युझर्सला कोणतेही वाक्य पूर्ण करण्यासाठी होते. Gmail च्या या नव्या फिचर अपग्रेडमध्ये ‘Offline मोड‘ हेही एक नवं फिचर लाँच करण्यात आलं आहे. या फिचरच्या मदतीने युझर्स कोणत्याही मेलला इंटरनेट कनेक्शनशिवाय सर्च करु शकणार आहेत तसंच रिप्लाय देऊ शकणार आहेत.
‘जीमेल’ने लाँच केलेलं तिसरं फिचर आहे ‘Nudge‘. हे फिचर युझरला त्याने कोणत्या ईमेलला रिप्लाय दिलेला नाहीये, याविषयी रिमाईंडर देणार आहे. युझर्सना जीमेलचा वापर करतेवेळी जास्त अडचणींचा सामना करावा लागू नये तसंच त्यांना अधिक सोप्या पद्धतीने जीमेलचा वापर करता यावा, यासाठी जीमेलने ही ३ नवी फिचर्स लाँच केली आहेत.
याशिवाय Gmail युझर्सना लवकरच Gmail compose विंडोमध्ये Undo आणि Redo ची परवानगी देणार आहे. तसंच Google कडून एक विशेष key देण्यात येणार आहे, ज्यामुळे स्ट्राईकथ्रू टेक्स्ट आणि ईमेल डाउनलोड करता येणार आहे. Google ने सांगितल्यानुसार, युझरने ड्राफ्ट ईमेल आणि कंटेंट चुकून डिलीट केल्यास, या key च्या साहाय्याने त्याला compose view च्या सहाय्याने त्याला ते परक मिळवता येणार आहेत. याशिवाय युझर्सकडे undo आणि redo हे दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध राहणार आहेत.