घरटेक-वेकअँड्रॉईडचं 'Pie' व्हर्जन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्यं

अँड्रॉईडचं ‘Pie’ व्हर्जन लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्यं

Subscribe

अँड्रॉईडचं '९'वं व्हर्जन लाँच झालं असून त्याला 'Android Pie' असं नाव देण्यात आलंय. सुरुवातीला Android 9 (Pie) व्हर्जन काही निवडक डिव्हाईससाठीच वापरता येणार आहे.

या बातमीमुळे अँड्रॉईड युजर्स खुष झाले असणार यात काहीच शंका नाही. अँड्रॉईडने त्यांच्या ‘ओरियो 8.0’ या व्हर्जननंतर आता हे नवीन Android 9 Pie व्हर्जन लाँच केलं आहे. गुगल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुंदर पिचाई यांनी सुरुवातीला या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव, ‘अँड्रॉईड P’ असं नक्की केलं होतं. मात्र, आता ते बदलून Android 9 Pie असं ठेवण्यात आलं आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक आर्टिफिशल इंटेलिजंस असलेले फिचर्स देण्यात आले आहेत. Android 9 Pie ही ऑपरेटिंग सिस्टीम ८ आणि ९ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र, सुरुवातीला या नव्या सिस्टीमचे ‘बीटा’ व्हर्जन काही निवडक अँड्रॉईड फोन्समध्येच वापरता येणार आहे. सोमवारपासून गुगल पिक्सल 2XL डिव्हाईससाठी हे Android 9 Pie व्हर्जन सुरु करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ आता टप्याटप्याने अन्य फोन्ससाठी ही ऑपरेटिंग सिस्टीम खुली होणार आहे.

Android 9 Pie ची वैशिष्ट्ये

आकर्षक फिचर्स: सर्वप्रथम आपण या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमच्या एकंदर लूकवर नजर टाकूया. यामध्ये पहिल्यांदाच अँड्रॉईडच्या होम बटणाला रिप्लेस करुन त्याजागी छोटसं हँडल लावण्यात आलं आहे. सोबतच या सिसीस्टमचा अॅप स्विचर आयफोन X प्रमाणे उभ्या पद्धतीने स्क्रोल होणार आहे. हे नवं फिचर नक्कीच युजर्सना आकर्षित करणारं आहे. अशाप्रकारच्या नवीन फिचर्सच्या माध्यमातून युजर्ससाठी स्मार्टफोन वापरणं अधिक सोयीस्कर करावं, हा गुगलचा मुख्य उद्देश आहे.

- Advertisement -

अॅडॉप्टिव्ह बॅटरी: या नव्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अॅडॉप्टिव्ह बॅटरी हे एक मुख्य फिचर देण्यात आलं आहे. या फिचरच्या माध्यमातून बॅटरी लाईफ सुधारण्यावर आणि त्याची क्षमता वाढवण्यावर भर दिला गेला आहे. दरम्यान ‘अॅंड्रॉईड पाय’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम बॅटरी लाईफसोबतच सीपीयू परफॉर्मन्स सुधारण्याचं कामही करेल.
स्मार्टफोनशी मारा गप्पा: या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक नवं गूगल असिस्टंस फिचर देण्यात आलं आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशी एखाद्या माणसाशी बोलता तशाचप्रकारे बोलू शकता. यासाठी गूगलने या फिचरमध्ये ६ नवीन आवाजही जोडले आहेत.

‘अॅप’साठी सेट करा टाईम लिमिट: Android 9 Pie सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही फोनमधील अॅप्सच्या वापरावर वेळेचा निर्बंध घालू शकता. तुम्ही सेट केलेल्या टाईम लिमिटच्या पलीकडे जर तुम्ही त्या विशिष्ट App चा वापर करत असाल, तर ऑपरेटिंग सिस्टिमच तुम्हाला त्याविषयी अलर्ट करेल.

- Advertisement -

DND मोड: अँड्रॉईडच्या ओरियो 8.0 या व्हर्जनमध्येही ‘डू नॉट डिस्टर्ब’ हा मोड देण्यात आला आह. मात्र, या नवीन Pie व्हर्जनमध्ये या DND मोडला अधिक सोयीस्कर आणि प्रगत बनवण्यात आलं आहे. या मोडचा वापर करुन तुम्ही तुमच्या नंबर्सना ‘स्टार’ मार्क करु शकता. स्टार मार्क केलेल्या नंबर व्यतिरिक्त अन्य कोणीही तुम्हाला मेसेज किंवा कॉल करु शकणार नाहीत. जर तुम्ही सु्ट्टीवर किंवा मिटींगमध्ये असाल तर हा मोड enable केल्यानंतर तुम्ही केवळ महत्वाचे कॉल घेऊ शकता.

‘या’ डिव्हाईसमध्ये मिळणार अॅक्सेस

खाली दिलेल्या मोबाईल डिव्हाईसमध्ये तुम्ही Android 9 Pie ही व्हर्जन वापरु शकता. दरम्यान यापैकी काही फोन्समध्ये याचा अॅक्सेस देण्यात आला असून, काही फोन्सना येत्या काही काळात हा अॅक्सेस दिला जाईल.

  • गूगल पिक्सल
  • वनप्लस 5, वनप्लस 5T आणि वनप्लस 6
  • नोकिया 7 प्लस, नोकिया 6.1 आणि नोकिया 8
  • सॅमसंग डिव्हाईस
  • Mi A1 आणि Mi A2
  • Vivo X21
  • Sony Xperia XZ2
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -