घरटेक-वेकYoutube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार!

Youtube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार!

Subscribe

Youtube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार असल्याचा अंदाज आहे. Youtube Music सेवेवर गुगलला अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे आता Google Play Artist Hub ची जागा Youtube Music घेणार आहे

आवडत्या गीतकार, संगीतकाराची गाणी आवडीने ऐकण्यासाठी Google Play Artist Hub या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत होता. मात्र Google Plus आणि Inbox by Gmail या सेवा बंद केल्यानंतर आता गुगलने आणखी एक सेवा लवकरच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणारं Google Play Artist Hub ज्यावरून आपण आपल्या आवडत्या गीतकार, संगीतकाराची गाणी आवडीनं ऐकत असतो. ते अ‍ॅप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. Google Play Artist Hub हे ३० एप्रिलनंतर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे, ३० एप्रिलनंतर नवीन युजर्सना या अ‍ॅप्लिकेशनवर लॉगईन करता येणार नाही.

- Advertisement -

३० एप्रिलपर्यंतच लाभ 

या अॅप्लिकेशनचा वापर करून यामध्ये कलाकार आपली गाणी अपलोड करू शकत होते. यासोबतच, हे अॅप्लिकेशन सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला आवडणारी गाणी यावर ऐकता येत होते. परंतु, ही सेवा आता बंद होत असल्याने युजर्स नाराज झाले आहे. जे युजर्स ही सेवा वापर वापरत आहेत त्यांना फक्त ३० एप्रिलपर्यंतच त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर या अ‍ॅप्लिकेशनवर कोणत्याही प्रकारे गाणी, ऑडिओ, व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत.

- Advertisement -

Youtube Music मुळे ही सेवा बंद

Google Play Artist Hub या अ‍ॅप्लिकेशनवर ज्या कलाकारांनी आपले व्हिडिओ, किंवा गाणी अपलोड केली आहेत त्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत फायनल रिपोर्ट आणि पैसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर १ जुलैपासून हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोरवरूनही हटविण्यात येणार आहे. Youtube Music मुळे ही सेवा गुगल बंद करणार असल्याचा अंदाज आहे.

Youtube Music सेवेवर गुगलला अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे आता Google Play Artist Hub ची जागा Youtube Music घेणार आहे. याआधी गुगलने Google, Allo, Inbox by Gmail या सेवा बंद केल्या आहेत. आगामी काळातही गुगल अजून कोणती नवीन सेवा युझर्ससाठी आणते ते पाहाणंही महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -