घरटेक-वेकहार्ले डेव्हिडसन येत्या २७ ऑगस्टला भारतात लाँच करणार ‘लाइव्हवायर’

हार्ले डेव्हिडसन येत्या २७ ऑगस्टला भारतात लाँच करणार ‘लाइव्हवायर’

Subscribe

अमेरिकन मोटारसायकल निर्माता कंपनी हार्ली डेव्हिडसन 27 ऑगस्टला भारतात इलेक्ट्रिकल मोटारसायकल लाइव्हवायरला लाँच करणार आहे. ही बाइक दिल्लीमध्ये आजोजित एका इव्हेंटमध्ये सादर केली जाईल. यासाठी कंपनीने आमंत्रण देण्यास देखील सुरूवात केली आहे.

हार्ली डेव्हिडसनच्या या नवीन बाइकची किंमत जवळपास 21 लाख रुपये आहे. कंपनीनुसार, ग्राहकांना इलेक्ट्रिफाइ अमेरिकन स्टेशन्सवर या बाइकला चार्ज करता येईल. तसेच यावर्षीच्या अखेरपर्यंत अमेरिका, कँनडा व अन्य युरोपियन देशात सुध्दा ही बाइक लाँच केली जाणार आहे. या बाइकचे डिजाइन कंपनीच्या अन्य बाइकपेक्षा वेगळे आहे. या बाइकमध्ये अनेक नवीन फिचर्सचा समावेश आहे.

- Advertisement -

या नवीन बाइकला एकदा चार्ज केल्यानंतर बाइक 235 किमी चालेल. तसेच 0 ते 100 किमीचा स्पिड पकडण्यासाठी बाइकला केवळ 3 सेंकद लागतील. यामध्ये देण्यात आलेले इलेक्ट्रिक मोटर 103 PS आणि 116 Nm टार्क जनरेट करते. याशिवाय डीसी फास्ट चार्जिंगच्या मदतीने बाइकला एका तासात पुर्ण चार्ज केले जाऊ शकते. तर 40 मिनिटात ही बाइक 80 टक्के चार्ज होईल. बाइकमध्ये रँपिड एक्सलरेशन देखील आहे. फिचर्सबद्दल सांगायचे तर, बाइकमध्ये 4.3 इंच TFT डिस्प्ले, LED हँडलँम्प्स, ड्रँग टॉर्क स्लिप कंट्रोल सिस्टिम, रिप्लेक्स डिफेंसिव रायडर सिस्टिम, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि कॉर्नरिंग एन्हँस्ड ट्रँक्शन कंट्रोल सिस्टिम देण्यात आली आहे. एवढेच नाही तर यामध्ये स्मूथ रायडिंगसाठी सात वेगवेगळे रायडिंग मोड्स देखील देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -