घरटेक-वेकदिवाळीत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी; हीरो देतेय जबरदस्त ऑफर्स

दिवाळीत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी; हीरो देतेय जबरदस्त ऑफर्स

Subscribe

दिवाळीत हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी आहे. Hero Electric कंपनी त्यांच्या ई-स्कूटर्सवर ५ हजार पर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे. शिवाय, कंपनी अनेक ऑफर्स देत आहे. कंपनी लिमिटेड फेस्टिव्ह ऑफर देत आहे. ऑफरमध्ये ग्राहक कोणतीही टू-व्हीलर एक्सचेंज करुन इलेक्ट्रिक ई-स्कूटर विकत घेऊ शकतात. यावर ५ हजारापर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे.

हीरो इलेक्ट्रिक कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेस्टिव्ह ऑफर ही लिथियम आयर्न आणि लीड अॅसिड बॅटरी अशा दोन्ही गाड्यांवर लागू आहे. १४ नोव्हंबरपर्यंत या ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे. लीड Acid मॉडल्सच्या खरेदीवर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर ५ हजार रुपये डिस्काउंट आहे. शिवाय, रेफरल स्किमद्वारे गाडी खरेदी केल्यास १ हजाराचा फायदा होणार आहे. म्हणजेच एकूण ६ हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे.

- Advertisement -

कंपनीने असे म्हचटले आहे की, नविन लाँच झालेल्या Optima HX City Speed आणि Nyx HX City Speed या दोन स्कूटर्सवर ही ऑफर लागू नाही आहे. हीरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक गाड्या सहज खरेदी करता याव्यात, यासाठी आम्ही ऑफर्स देत आहोत. हीरो इलेक्ट्रिकच्या सर्व स्कूटर्सवर ३ दिवसांपर्यंत रिटर्न पॉलिसी उपलब्ध आहे.


हेही वाचा – म्हणून रोहित हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला – सुनिल गावसकर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -