घरटेक-वेकHero ने सर्वात स्वस्त 100cc ची BS6 बाईक केली लाँच

Hero ने सर्वात स्वस्त 100cc ची BS6 बाईक केली लाँच

Subscribe

Hero MotoCorpv भारतीय बाजारात आपल्या कंपनीची Hero HF Deluxe BS6 किक-स्टार्ट व्हेरिएंट लाँच केला आहे. कंपनीने स्पोक्ड व्हील वेरिएंटची किंमत ४६,८०० रुपये आणि अॅलोय व्हील व्हेरिएंटची किंमत ४७,८०० ठेवली आहे. या सर्व किंमती एक्स शोरुन दिल्लीत आहे. HF Deluxe चे सर्वात भारी व्हेरिएंट आहे आणि यामध्ये कंपनीने इलेक्ट्रिक स्टार्ट फीचर्स दिले नाही आहेत. इलेक्ट्रिक स्टार्ट व्हेरिएंटच्या ऐवजी kick-start व्हेरिएंटची किंमत ९,९०० रुपये कमी केली आहे.

नवीन Hero HF Deluxe मध्ये कंपनीने फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. जे ‘Xsens’ टेक्नोलॉजीसह येते आणि ते ९ टक्के चांगले मायलेज आणि एक्सेलेरेशन देते. नवीन इंजिन 8,000 rpm वर 7.94 bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते. जयपूरमध्ये असलेल्या Hero Motocorp इनोव्हेशन आणि टेक्नोलॉजी सेंटरमध्ये या मोटरसायकल डिझाईन केली गेली. Hero HF Deluxe ने 100 cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये ६० टक्के बाजारात हिस्सा आहे. यापूर्वी Hero कंपनीने भारतात २० लाखांहून अधिक युनिट्सची HF Deleuxeची विक्री केली आहे. भारतीय बाजारात याची टक्कर Bajaj CT100सोबत आहे.

- Advertisement -

BS6 Hero HF Deluxe मध्ये नवीन ग्राफिक्स आणि रंग दिले आहेत. 100 cc प्रवासी मोटारसायकल कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लॅकसोबत रेड, तसेच ब्लॅकसोबत पर्पल आणि ब्लॅकसोबत ग्रे आणि दोन नवीन कलर स्कीम्स टेक्नो ब्लू आणि हेवी ग्रेसोबत ग्रीन दिला आहे.

मे २०१० मध्ये Hero MotoCorp ने १,१२,८८२ युनिट्स डिस्पॅच केले आहेत. या तुलनेत २०१९मध्ये कंपनीने ६,५२०२९ युनिट्स डिस्पॅच केले होते. कोरोनाचे संकटात मे २०२०मध्ये १ लाखाहून अधिक मोटारसायकलची विक्री झाली असून स्कूटरची संख्या फक्त ६,६४४ इतकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चिनी कंपनी शाओमी ११ जूनला पहिला लॅपटॉप MI Notebook करणार लाँच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -