हीरो मोटोकॉर्प कंपनीची ‘ही’ नवीन सेवा सुरू

New Delhi
hero motocorp starts new service for two wheelers
हीरो मोटोकॉर्प कंपनीची 'ही' सेवा सुरू

प्रसिद्ध मोटारसायकल उत्पादक हीरो मोटोकॉर्प कंपनीने एक नवीन सेवा सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत थेट दुचाकी पोहोचवण्याचा निर्णय हीरो मोटोकॉर्प कंपनीने घेतला आहे. ‘होम डिलिव्हरी’ ही नवी सेवा कंपनीने सुरू केली आहे.

बाइक किंवा स्कुटर https://www.hgpmart.com या इ-कॉमर्सच्या संकेतस्थळावरून खरेदी ग्राहकांनी खरेदी केल्यास या नव्या सेवेचा उपभोग घेता येणार आहे. मुंबई, नोएडा आणि बेंगळुरू या तीन शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. ग्राहकांना होम डिलिव्हरीसाठी ३४९ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. कंपनीचं लक्ष्य हे येत्या काही महिन्यात २५ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचं आहे.

कशी करायची होम डिलिव्हरी?
  • पहिल्यांदा https://www.hgpmart.com या संकेतस्थळावर जावं.
  • त्यानंतर लॉग-इन करावं. लॉग-इन झाल्यानंतर बाइक निवडून डिलर निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला होम डिलिव्हरीचा पर्याय दिसेल.
  • जेव्हा होम डिलिव्हरी पर्याय निवडाल तेव्हा ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.
  • हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर हिरो कंपनीशी निगडीत असलेले थर्ड-पार्टी सर्विस प्रोव्हायडर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल आणि आवश्यक असलेले कागदपत्र घेईल.
  • आरटीओमध्ये बूक केलेली बाइक किंवा स्कुटर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ती गाडी तुमच्या पर्यंत पोहचवली जाईल.