घरटेक-वेकभारतात लाँच होणार होंडाची हायब्रीड कार

भारतात लाँच होणार होंडाची हायब्रीड कार

Subscribe

भारत सरकारतर्फे देशातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक बाईक आणि कार अनेक कंपन्यांनीही बाजारात लाँच केल्या आहेत. त्यातच आता इलेक्ट्रॉनिक कारऐवजी हायब्रीड कार देशातील प्रसिद्ध होंडा ऑटो कंपनी तयार करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक कारच्या चार्जिंगसाठी देशातील अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत. बराच अवधी चार्जिंग स्टेशनमध्ये वाढ होण्यासाठी लागू शकतो, असा दावा कंपनीने केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक कारऐवजी हायब्रिड कार कंपनी बाजारात आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

होंडाची हायब्रिड कार पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 रोजी ऑटो एक्सपो कार्यक्रमात लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे. जपानमधील टोकियो मोटार शो आणि भारतात ऑटो एक्स्पो कार्यक्रमात 2020 मध्ये कंपनी हायब्रिड कार अधिकृतपणे लाँच करणार आहे. कंपनी यानंतर होंडा सिटी कारही लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.

इंटेलिजेंट मल्टी मोड ड्राईव्ह (iMMD) टेक्नॉलॉजीचे फीचर होंडाच्या या हायब्रीड कारमध्ये असणार आहे. आतापर्यंत हे फीचर फ्लॅगशिप कार होंडा अकॉर्डमध्ये देण्यात आले आहे. तर होंडाच्या हायब्रीड कार देण्यात येणारे हे फीचर आकाराने छोटे असेल. कंपनी ही नवीन कार साडेसहा लाख रुपयात लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारमध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. 2030 पर्यंत आमच्या कंपनीचे दोन तृतीयांश हिस्सा हा इलेक्ट्रॉनिक करायचा असल्याचे होंडाचे अध्यक्ष आणि डायरेक्टर हकीगो यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -