घरटेक-वेकऑनर कंपनीचे भारतात तीन फोन लाँच

ऑनर कंपनीचे भारतात तीन फोन लाँच

Subscribe

ऑनर कंपनीने भारतात ’ऑनर २० प्रो’, ’ऑनर २०’ आणि ’ऑनर २० आय’ हे तीन फोन लाँच केले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात हे तीन मोबाइल लाँच करण्यात आले आहे. ’ऑनर २० प्रो’मध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून १६ मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेन्स आहे. त्याशिवाय ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा असून ३ डी पोट्रेट लाइटनिंग फीचर आहे. फोनमध्ये ६.२६ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये ड्युन एनपीयूसह ७ एनएम किरीन ९८० प्रोसेसर आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणार्‍या ’ऑनर २० प्रो’ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे.

’ऑनर २०’ मोबाइलचा डिस्प्ले ६.२६ इंचाचा असून एचडी पंच-होल आहे. फोनमध्ये ६ जीबीचा रॅम असून HiSilicon Kirin 980 SoC प्रोसेसर आहे. ’ऑनर २०’मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असून सोनी आयएमएक्स ५८६ सेंसर आहे. त्याशिवाय फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेंकडरी सेंसर आहे. त्याशिवाय २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असून मायक्रो सेंसर २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता ३७५० एमएएच इतकी आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणार्‍या ’ऑनर २०’ ची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे.

- Advertisement -

तर ’ऑनर २० आय’मध्ये ६.२१ इंचाचा फुलएचडी वॉटरड्ऱॉप नॉच डिस्प्ले आहे. ’ऑनर २०आय’मध्ये ऑक्टा कोर किरीन ७१० एफ एसओसी प्रोसेसर आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. २४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असून ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता ३४०० एमएएच इतकी आहे. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर नाही. ’ऑनर २० आय’ची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -